पाणीपरवानगीचा सावळागोंधळ
By Admin | Published: March 5, 2017 04:13 AM2017-03-05T04:13:22+5:302017-03-05T04:13:22+5:30
उजनी धरणाच्या पाणी परवानगीबाबत दौंड, भीमानगर, इंदापूर पाणी व्यवस्थापन विभागाच्या दोन्ही कार्यालयांतून समन्वय नसल्यामुळे उजनी धरण पाणी
देऊळगावराजे : उजनी धरणाच्या पाणी परवानगीबाबत दौंड, भीमानगर, इंदापूर पाणी व्यवस्थापन विभागाच्या दोन्ही कार्यालयांतून समन्वय नसल्यामुळे उजनी धरण पाणी व्यवस्थापन विभागाच्या सावळा गोंधळासमोर आला आहे.
मात्र याचा प्रत्यक्ष परिणाम दौंड तालुक्यातील उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेला शेतकऱ्यांना बसत आहे. वास्तविक पाहता उजनीच्या मुख्य शाखा असलेला भीमानगर इंदापूर येथून उजनी धरणाच्या पाणी परवानगीबाबत स्पष्ट सांगण्यात येत आहे, की उजनी धरणातील शेतकऱ्यांना उजनीच्या पाण्याबाबत तात्पुरत्या स्वरूपात परवाने बंद करण्यात आले आहेत.
दौंडच्या कार्यालयात पाणी परवानगीच्या स्थगितीबाबत इंदापूरचे भीमानगर उजनी पाणी व्यवस्थापन शाखेतून लेखी स्वरूपात
काहीही आले नाही. परिणामी
दौंडच्या शाखेतून पाणी परवानगीबाबत दौंडच्या शेतकऱ्यांचे रीतसर २७ पाणी परवानगीप्रकरणे भीमानगर येथील कार्यालयात पाठविण्यात आली आहेत.
आता या शेतकऱ्यांपुढे या दोन्ही कार्यालयांतून मिळणाऱ्या वेगवेगळ्या उत्तरांमुळे शेतकरी अडचणीत
सापडला आहे. (वार्ताहर)
शेतकरी चिंताक्रांत
दौंडच्या पूर्व भागातील आलेगाव ते खानोटा भागातील शेतकरी पाणी परवानगी मिळविण्यासाठी शेतकऱ्याला होणारा खर्च भरण्यासाठी तयार आहेत. पाणी परवानगीबाबत तात्पुरती स्थगिती उठेल की कायम राहील याबाबत निर्णय होत नाही. आता जर शेतकऱ्यांनी पाणी परवानगीसाठी खर्च केला आणि तात्पुरती स्थगिती कायम राहिली तर शेतकऱ्यांनी केलेला खर्च वायाही जाईल आणि शेतातील पिके पाण्यावाचून जळून जातील या भीतीपोटी शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.
बँकेतील कर्जप्रकरणे प्रलंबित...
आलेगाव ते खानोटा या भागातील ज्या शेतकऱ्यांची उजनी धरणातील पाणी परवानगीची मुदत संपली आहे, त्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेतून दिली जाणारी कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. परिणामी आता शेतकऱ्यांना पिकांचे आर्थिक गणिते जुळविण्यासाठी लागणारी आर्थिक रसद बंद होण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा उजनी धरणाच्या पाणी परवानगीबाबत संबंधित खात्याने वेळीच निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.