देशी गाय नामशेष होण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 12:59 AM2018-12-04T00:59:25+5:302018-12-04T00:59:33+5:30
गोमातेला हिंदू धर्मामध्ये ३३ कोटी देवांचे रूप मानले जाते. ज्या गोमातेला पावित्र्याचे, आईचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. तीच गोमाता अर्थात देशी (साधी) गाय दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
रावणगाव : गोमातेला हिंदू धर्मामध्ये ३३ कोटी देवांचे रूप मानले जाते. ज्या गोमातेला पावित्र्याचे, आईचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. तीच गोमाता अर्थात देशी (साधी) गाय दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचे होत असलेले तुकडीकरण, शासकीय प्रकल्पासाठी घरे बांधणे, दुकाने, मॉल्स, आॅफिसेस, कारखाने अशा विविध कारणांसाठी जमिनीचे होत असलेले संपादन; तसेच पावसाची कमतरता, सतत पडणारा दुष्काळ यामुळे चाऱ्याची कमतरता भासत आहे. अशावेळी देशी गार्इंना खाद्यपुरवठा दिवसेंदिवस महागाच होत आहे. देशी गार्इंपासून उत्पन्नदेखील कमी मिळते. त्यामुळे देशी गाई सांभाळणे परवडत नसल्याची शेतकºयांची भावना झाली आहे. पूर्वी शेतीसाठी बैलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असे; परंतु यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीची नांगरणी, पेरणी, मळणी अशी जवळ जवळ सर्वच कामे यंत्रांच्या साहाय्याने झटपट करता येऊ लागल्याने शेतीमशागतीत बैलांचा वापर कमी होऊ लागल्याने देशी गाईंचे महत्त्व आपोआपच कमी होऊ लागले आहे.
गेल्या काही दशकांपासून देशी गाईची जागा संकरित गाईने घेतली आहे. संकरित गाईपासून मिळणाºया दुधाच्या तुलनेत देशी गाईंपासून खूपच कमी प्रमाणात दूध मिळत असल्यामुळे देशी गाईच्या पालनाकडे शेतकरी दिवसेंदिवस दुर्लक्ष करीत आहेत. जसजशी देशी गाईंची संख्या कमी कमी होऊ लागली आहे, तस तसे बैलपोळासारख्या सणांनादेखील खºयाखुºया बैलांऐवजी मातीचे अथवा लाकडाचे बैल खरेदी करून त्यांची पूजा करण्याची वेळ लोकांवर आली आहे. गोमातेच्या गोमुत्रामुळे बरेचसे आजार दूर होतात तीच गोमाता अलीकडे बोटावर मोजण्या एवढ्याच शेतकºयांकडे पाहावयास मिळत आहे.
पूर्वी गावाकडे देशी गाईंचे कळप माळरानावर चरताना मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळत होते. दिवसेंदिवस ते चित्र दुर्मिळ होत चालले आहे. त्यामुळे देशी गाई आत्ता गोशाळेमध्येच मोठ्या संख्येने पाहावयास मिळत आहेत. परिणामी, देशी गाईचे दुधासह तूप मिळणेदेखील दुरापास्त होऊ लागले आहे. पूर्वीचे वैभवशाली दिवस पुन्हा प्राप्त करावयाचे असतील तर शेतकºयांनी देशी गाईंचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले पाहिजे
>का होऊ लागली देशी गाय नामशेष?
पावसाची अनियमितता, सतत पडणारा दुष्काळ, दिवसेंदिवस नष्ट होत असलेली चराऊ कुरणे, शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा
वाढता वापर.