अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर

By Admin | Published: May 12, 2017 04:45 AM2017-05-12T04:45:26+5:302017-05-12T04:45:26+5:30

कोणत्याही किल्ल्यावर गडाचे गडपण जपणारे आणि त्याची साक्ष म्हणून पुरावे देत उपलब्ध असणाऱ्या अनेक वास्तू या बाबींमुळेच

On the way to the extinction extinction | अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर

अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर

googlenewsNext

अशोक खरात ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खोडद : कोणत्याही किल्ल्यावर गडाचे गडपण जपणारे आणि त्याची साक्ष म्हणून पुरावे देत उपलब्ध असणाऱ्या अनेक वास्तू या बाबींमुळेच तो किल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, या वास्तू आणि हे पुरावेच जर काळाच्या ओघात लोप पावले, तर कोणताही किल्ला हा केवळ एक डोंगर म्हणूनच ओळखला जाईल. जुन्नरपासून २० किमी अंतरावर आपल्या अवाढव्य भिंतींसह अभेद्य आणि पायथ्याजवळून पाहिल्यानंतर काळजात धडकी भरवणारा किल्ले चावंडवरील वाडे, स्नानगृह आणि इतर विविध अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
चावंड किल्ल्यावरील पुष्करणी व तिचे कोरीवकाम पाहता, त्या ठिकाणी तत्कालीन भव्य असे मंदिर असावे, असा निष्कर्ष काढता येऊ शकतो आणि चावंड किल्ल्याची जुन्नरमधील जागा, इतर बांधकामांचे अवशेष बघता इथे नक्कीच कोणी तरी तत्कालीन इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्ती वास्तव्याला होत्या, याला दुजोरा मिळतो. जुन्नरच्या पश्चिमेला २० किमी अंतरावर सह्याद्रीच्या बालाघाट रांगेत वसलेला आखिवरेखीव किल्ला म्हणजे चावंड किल्ला होय. चहूबाजूंनी कातळाच्या दीडशे-दोनशे फूट उंच नैसर्गिक निर्माण झालेल्या कातळ भिंती म्हणजे या किल्याचे वैशिष्ट्य. घळीतून वर जाणारा मार्ग पर्यटकांना चढण्यास सोपा जावा व पर्यटक येथे आकर्षिला जाऊन येथील रहिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून वन विभाग जुन्नरच्या प्रयत्नांनी पायरीमार्ग व रेलिंग केले.

Web Title: On the way to the extinction extinction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.