भूंकप वाटला म्हणून आम्हीही पळालो
By admin | Published: October 31, 2014 11:41 PM2014-10-31T23:41:22+5:302014-10-31T23:41:22+5:30
रात्री अडीच ते पावणोतीनच्या सुमारास घराचे पत्रे उडाल्यासारखा आणि ब्लास्ट झाल्यासारखा आवाज झाला म्हणून आम्ही घराच्या गॅलरीत आलो,
Next
पुणो : रात्री अडीच ते पावणोतीनच्या सुमारास घराचे पत्रे उडाल्यासारखा आणि ब्लास्ट झाल्यासारखा आवाज झाला म्हणून आम्ही घराच्या गॅलरीत आलो, तर समोरची पिताराम इमारतीचे कॉलम फुटताना आम्हाला दिसले. आम्हाला वाटले भूकंप झाला. म्हणून घरातले सर्व बाहेर पळालो. आमच्या इमारतीचे दोन जिने उतरेर्पयत ही सर्व इमारत कोसळली आणि सर्वत्र मातीचे लोट उठले.
हा थरारक अनुभव आहे, कोसळलेल्या इमारतीच्या शेजारी असलेल्या साई विश्व या इमारतीमधील जाधव कुटुंबीयांचा तीन वाजण्यास दहा मिनिटांचा अवधी असतानाचा. प्रज्ञा अजय जाधव यांनी अग्निशमनदलास रात्री 3 वाजून 23 मिनिटांनी या घटनेची माहिती दिली. त्यानंतर, या कुटुंबातील अजय जाधव, गोपाल राठोड, प्रवीण पवार, शिवाजी पवार यांनी गॅलरीत उभे राहून आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांना जागे केले.
या घटनेबाबत बोलताना प्रज्ञा जाधव म्हणाल्या, की आम्हाला स्लॅब फुटल्याचे आवाज आल्यानंतर घराबाहेर आलो. आधी भूकंप झाल्यासारखे वाटत होते. त्याच वेळी आसपासच्या इमारतीमधून जोरजोरात ओरडण्याचे आणि कोसळणा:या इमारतीमधील नागरिकांना बाहेर येण्याच्या सूचना नागरिक करीत होते. त्या ऐकून ते नागरिकही घराबाहेर पळत होते. त्यामुळे आम्ही तत्काळ अग्निशमदलास कॉल केला. इमारतीतून बाहेर पडण्यास आम्हाला अवघी चार ते पाच मिनिटे लागली. आम्ही खाली पोहोचेर्पयत ती इमारत जमीनदोस्त झाली होती.