'आम्हाला सुईची भीती वाटते', कोरोना लसीकरणात मुलांची पाठ; पुण्यात केवळ १० टक्के लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 02:47 PM2022-04-26T14:47:34+5:302022-04-26T14:47:45+5:30

पुणे : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा संभाव्य धोका ...

We are afraid of needles children lessons in corona vaccination Only 10 percent in Pune | 'आम्हाला सुईची भीती वाटते', कोरोना लसीकरणात मुलांची पाठ; पुण्यात केवळ १० टक्के लसीकरण

'आम्हाला सुईची भीती वाटते', कोरोना लसीकरणात मुलांची पाठ; पुण्यात केवळ १० टक्के लसीकरण

googlenewsNext

पुणे : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन लसीकरणावर भर देणे गरजेचे आहे. मात्र, शहरातील लसीकरण संथगतीने सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषत: १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचा लसीकरणाला संथ प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या वयोगटाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ १० टक्के मुलांचे लसीकरण झाले आहे. मुलांना सुईची भीती वाटत असल्याने ते लसीकरणाला येत नसावेत, अशी शंका व्यक्त होत आहे.

जून महिन्यामध्ये चौथ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आल्याने केंद्र सरकारने १६ मार्चपासून १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली. जिल्ह्यात १२ ते १४ वर्षे वयोगटातील लोकसंख्या ५ लाख ६१ हजार, तर शहरातील लोकसंख्या १ लाख ७५ हजार एवढी आहे. गेल्या महिन्याभरात यापैकी केवळ १७ हजार ४७८ मुलांचा पहिला डोस, तर २४३५ मुलांचा दुसरा डोस झाला आहे. लसीकरणाचा वेग वाढण्याची गरज वैद्यकतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात १२ ते १४ वर्षे वयोगटातील ५ लाख ६१ हजारजणांपैकी १ लाख ६३ हजार ५९१ जणांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे, तर ११ हजार २३० जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील या वयोगटाच्या एकूण लोकसंख्येपैकी २९ टक्के मुलांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे.

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यावर शाळा पूर्ववत सुरू करण्यात आल्या. शाळांच्या वेळा आणि लसीकरणासाठी येण्याचे प्रमाण हा ताळमेळ जुळत नसल्याने सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट पहायला मिळाला. त्यानंतर शाळांमध्ये लसीकरणास मान्यता देण्यात आली. सुरुवातीला आठ शाळांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले. सध्या शहरातील ३० लसीकरण केंद्रांवर १२ ते १४ वयोगटातील मुलांना कॉर्बेव्हॅक्स लस दिली जात आहे. पालकांनी मुलांचे लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

शहरातील गेल्या पाच दिवसांमधील १२-१४ वयोगटाचे लसीकरण :

दिनांक पहिला डोस दुसरा डोस

२३ एप्रिल ७७२ ९९९

२२ एप्रिल २८० २४६

२१ एप्रिल ६८१ २०९

२० एप्रिल ४७७ २८३

१९ एप्रिल ३४४ १२९

१८ एप्रिल १४६ १२७

जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती 

पुणे जिल्ह्यात १५ ते ५९ या वयोगटातील ७९ लाख ७७ हजार ८५७ जणांचा पहिला डोस, तर ६४ लाख ९४ हजार ५२४ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. १८ ते ५९ या वयोगटातील१३ हजार ८८० जणांचा बूस्टर डोस घेऊन झाला आहे. ६० वर्षांवरील ११ लाख ७७ हजार २८५ ज्येष्ठांचा पहिला डोस, तर १० लाख ११ हजार ६६६ जणांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे. यापैकी २ लाख २५ हजार ५४५ ज्येष्ठांनी बूस्टर डोस घेतला आहे.

Web Title: We are afraid of needles children lessons in corona vaccination Only 10 percent in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.