देशसेवेसाठी आम्ही आहोत सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:10 AM2021-05-30T04:10:49+5:302021-05-30T04:10:49+5:30

पुणे : तीन वर्षांचे यशस्वीपणे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण... देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण... आणि येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्याचा ...

We are ready for national service | देशसेवेसाठी आम्ही आहोत सज्ज

देशसेवेसाठी आम्ही आहोत सज्ज

Next

पुणे : तीन वर्षांचे यशस्वीपणे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण... देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण... आणि येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास... अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १४०व्या तुकडीचा शिस्तबद्ध दीक्षांत सोहळा शनिवारी खेत्रपाल परेड ग्राऊंडवर दिमाखात पार पडला. यंदा कोरोनामुळे सोहळ्यावर अनेक मर्यादा होत्या. या नियमांमुळे पालकांना आपल्या पाल्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणाला कोरोनामुळे उपस्थित राहता आले नाही. नाैदल प्रमुख करंबीर सिंग यांनी विद्यार्थ्यांची मानवंदना स्वीकारत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून अनेक कठोर नियम शासनातर्फे लावण्यात आले आहे. असा स्थितीत सर्व बंद असताना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत १४० तुकडीतील विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत करत आपले प्रबोधिनीतील ३ वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले. प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांनी आपल्या सहकारी मित्रांना संचलानाद्वारे मानवंदना दिली. सकाळी ६ वाजता समारोहाला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रमुख पाहुणे अॅडमिरल करंबीर सिंग यांनी सोहळ्याची पाहणी केली. यानंतर बॅडच्या तालावर सर्वांनी संचलनाला सुरुवात करत प्रमुख पाहुण्यांना मानवंदला दिली.

अॅडमिरल करंबीर सिंग म्हणाले, भारतीय सशस्त्र दलांना मोठी परंपरा आहे. अनेक युद्धात त्यांनी शाैर्य गाजवले आहे. या अनमोल वारशाचा तुम्ही अभिमान बाळगावा. देशाचे तुम्ही भवितव्य आहात. पुढचा प्रवास खडतर आणि आव्हानांचा असणार आहे. त्यांना तोंड देताना एनडीएतील प्रशिक्षणाचा उपयोग होईल.

भविष्यातील युद्धपद्धती ही बदलत आहे. येणारे युद्ध हे जमीन, पाणी आणि हवेतून लढण्या सोबतच तंत्रज्ञानाद्वारेही लढले जाणार आहे. यात सायबर युद्धाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. युद्धात लढताना याद्वारे शत्रुला संभ्रमात ठेवून त्याचे जास्तीत जास्त नुकसान कसे करता येईल याच्या योजना आजच आखल्या जात आहेत. त्या दृष्टीने देशातील सशस्त्र दले तयारी करत आहेत. त्याचाच एकभाग म्हणजे थिएटर कमांड आहे. या कमांडच्या स्थापनेत आपले अमूल्य योगदान राहणार आहे. भारतीय सैन्यदलाला अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने या महत्त्वपूर्ण सुधारणा आहेत, असेली सिंग म्हणाले.

दीक्षांत संचलन सोहळ्यात ६९६ कॅडेटनी सहभाग घेतला होता. यात ४०१ तुकडीतील ३११ कॅडेट सहभागी झाले होते. या सोहळ्यात पायदळ तुकडीतील २१५ कॅडेट, नौदलाचे ४४ कॅडेट तर हवाई दलाच्या ५२ कॅडेटचा समावेश होता. तर १८ मित्रदेशांच्या कॅडेटनी सहभाग घेतला.

चौकट

या वर्षी बटालियन कॅडेट अ‍ॅडजूटंट मौसम वत्स याने सर्व विभागातून प्रथम येत राष्ट्रपती सुवर्णपदक जिंकले. कॅडेट कॅप्टन जयवंत ताम्रकरने व बटालियन कॅडेट कॅप्टन निरज यांनी गुणवत्तेच्या एकूण क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर येत राष्ट्रपतींचे रौप्यपदक पटकावले. तर कॅडेट सिंग पापोला याने गुणवत्तेच्या एकूण क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर येत कांस्यपदक पटकावले. या वर्षीचा चिफ ऑफ बॅनर चॅम्पियन स्क्वॉड्रनच्या गोल्फ स्क्वॉड्रनने मिळवला.

फोटो :

Web Title: We are ready for national service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.