कितीही तोडा, जोडा, आम्ही लढायला तयार; प्रभाग रचनेच्या फेरबदलावरून मनसेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 02:26 PM2022-08-04T14:26:49+5:302022-08-04T14:27:22+5:30

प्रभाग रचना तीनची होती आता चारची केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर महापौराची निवडही जनतेतून करावी असं आव्हान मनसे नेते वसंत मोरे यांनी केले.

we are ready to fight; MNS Vasant More target State Government over reshuffle of ward structure | कितीही तोडा, जोडा, आम्ही लढायला तयार; प्रभाग रचनेच्या फेरबदलावरून मनसेचा टोला

कितीही तोडा, जोडा, आम्ही लढायला तयार; प्रभाग रचनेच्या फेरबदलावरून मनसेचा टोला

googlenewsNext

पुणे - सरकारने पुन्हा एकदा प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय घेतला. आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलले परंतु प्रभाग रचना बदलण्याचं कारण काय? स्वत:च्या स्वार्थासाठी निर्णय घेतले जात आहेत. राजकारणाची चीड यायला लागली आहे. हिंमत असेल निवडणुकांना सामोरे जा. प्रत्येकजण आपापल्या परिने प्रभाग रचना बदलतोय. कितीही तोडा, जोडा आम्ही लढायला तयार आहे. कात्रज मनसेचाच बालेकिल्ला असणार. पुण्यात मनसेचा महापौर बनणार असा दावा मनसे नेते वसंत मोरे यांनी केला आहे. 

वसंत मोरे म्हणाले की, प्रभाग रचना तीनची होती आता चारची केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर महापौराची निवडही जनतेतून करावी. मग जनतेची काळजी आहे हे म्हणता येईल. मग महापौर कुणाचा हे कळेल. २०१७ ला भाजपाच्या फायद्याची प्रभाग रचना झाली. त्यानंतर मविआने त्यांच्या फायद्याची प्रभाग रचना केली. आता पुन्हा प्रभाग रचना बदलली. पक्षाचा सर्वांगिण विकास, आमदार-खासदारांचा विकास याकडेच राजकीय पक्षाचे लक्ष आहे. जनतेच्या प्रश्नाकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे आता यांचा गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे. जनतेनेही आता याकडे लक्ष द्यायला हवं. जनतेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी देणे गरजेचे आहे असं मोरेंनी सांगितले. 

कात्रजचं नाव बदनाम करण्याचा प्रकार   
कात्रजमध्ये शिवसैनिकांनी माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला केला. उदय सामंत यांचा मार्ग हा नव्हता मग ते याठिकाणाहून कसे गेले? ३०७ सारखा भयंकर गुन्हा स्वत: वकील असलेले शिवसेना नेते संभाजी थोरवे करणं अवघड आहे. शिवसैनिक आक्रमक झाल्याचं क्लिपमध्ये दिसतं. परंतु दोन गाड्यातून लोक उतरले. हत्यारं काढली. परंतु हा महाराष्ट्र आहे. इतकी अराजकता राज्यात आहे वाटत नाही. शिवसैनिकांची गर्दी इतकी नव्हती. काही तरुणांनी हुल्लडबाजी केली. विकास म्हटलं तर कात्रज नाव घेतले जाते. परंतु गेल्या २-३ दिवसांपासून कात्रजच्या नावाला बदनाम करण्याचा प्रकार सुरू आहे अशा शब्दात वसंत मोरे यांनी उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. 

Web Title: we are ready to fight; MNS Vasant More target State Government over reshuffle of ward structure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.