आम्ही तुमचे पोलीस मित्रच !
By admin | Published: April 26, 2017 04:13 AM2017-04-26T04:13:39+5:302017-04-26T04:13:39+5:30
‘तुमची मुले परदेशात आहेत, तुम्हाला सांभाळत नाहीत म्हणून निराश होऊ नका. आम्ही तुमचीच मुले आहोत, असे समजा. मनात
पुणे : ‘तुमची मुले परदेशात आहेत, तुम्हाला सांभाळत नाहीत म्हणून निराश होऊ नका. आम्ही तुमचीच मुले आहोत, असे समजा. मनात सकारात्मक विचार ठेवा. काहीही वाटलं तर आम्हाला न घाबरता सांगा. आम्ही तुमचे पोलीस मित्रच आहोत...’ हे आश्वासक बोल आहेत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचे. त्यांच्या या वाणीने ज्येष्ठांना केवळ आधारच दिला नाही, तर जगण्याचे बळही दिले.
निमित्त होते, पोलीस आयुक्त कार्यालयातील ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्मित करण्यात आलेल्या स्वतंत्र कक्षाच्या उद्घाटनाचे. शुक्ला यांच्या हस्ते या कक्षाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी अथश्री फाउंडेशनचे संचालक शशांक परांजपे, सुदेश खटावकर यांबरोबरच अनेक ज्येष्ठ नागरिकही उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांना पुणे पोलिसांच्या वतीने ओळखपत्रांचे वाटपही या वेळी करण्यात आले.
‘निवृत्त झालो, आता काय करायचे?’ असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांना पडतो. रोज नवीन समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. ज्येष्ठांच्या दिवसाला चार ते पाच तक्रारी असतातच. मुले नाहीत किंवा सांभाळत नाहीत म्हणून निराश होण्याची गरज नाही, असे त्या म्हणाल्या. पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) पी. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)