प्लाझ्मादान करणाऱ्यांसाठी ‘वुई केअर’चा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:10 AM2021-04-21T04:10:20+5:302021-04-21T04:10:20+5:30

याविषयी ग्रुपचा सदस्य चिन्मय साळवी म्हणाला, ‘‘आम्ही काही तरूण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. खरंतर गेल्या वर्षी पूर ...

‘We Care’ initiative for plasma donors | प्लाझ्मादान करणाऱ्यांसाठी ‘वुई केअर’चा पुढाकार

प्लाझ्मादान करणाऱ्यांसाठी ‘वुई केअर’चा पुढाकार

Next

याविषयी ग्रुपचा सदस्य चिन्मय साळवी म्हणाला, ‘‘आम्ही काही तरूण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. खरंतर गेल्या वर्षी पूर आलेला होता, तेव्हा आम्ही फेसबुकद्वारे भेटलो. त्यानंतर सामाजिक कामासाठी पुढाकार घेऊन ग्रुप तयार केला. ‘वुई केअर’अंतर्गत उपक्रम राबवत आहोत. आता कोविडमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. तसेच काही रुग्णांना प्लाझ्माची गरज असते. त्यासाठी आम्ही गुगल फॉर्म तयार केला आहे. त्यात ज्यांना कोविड होऊन गेला आहे, त्यांनी माहिती भरायची. त्यानंतर आमच्याकडे कोणाला प्लाझ्मा हवा असेल, तर फोन येतो. मग आम्ही संबंधित रक्तगटाचा डोनर शोधतो आणि त्याला संपर्क करून संबंधित गरजवंताला त्यांच्याशी जोडून देतो.’’

‘‘सध्या आमच्याकडे दररोज आठ-दहा फोन येतात. आतापर्यंत प्लाझ्मासाठी दीडशे अर्ज आले आहेत, तर शंभर प्लाझ्मा देणाऱ्यांची यादी आमच्याकडे आहे. याद्वारे अनेकांना प्लाझ्मा मिळत असून, त्यामुळे रुग्णांचा जीव वाचत आहे. वुई केअरमध्ये सुजीत नवले, दीक्षा दिंडे, विनित वाघ, रियाज शेख आदी सदस्य आहेत,’’ असे चिन्मय साळवी म्हणाला.

Web Title: ‘We Care’ initiative for plasma donors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.