हरलो नाही आम्ही लढलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:09 AM2021-05-06T04:09:41+5:302021-05-06T04:09:41+5:30

याविषयी बोलताना चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले की ''त्रास सुरू झाल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन लगेच एका पाठोपाठ एक एक करत, ...

We did not lose, we fought! | हरलो नाही आम्ही लढलो!

हरलो नाही आम्ही लढलो!

googlenewsNext

याविषयी बोलताना चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले की ''त्रास सुरू झाल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन लगेच एका पाठोपाठ एक एक करत, एकाच रुग्णालयात दाखल झालो. यावेळी सर्वांनी घाबरून न जाता एकमेकांना आधार दिला. सकारात्मक विचार ठेवले. त्यामुळे ७५ वर्ष वयाच्या आईसह आम्ही पाचही जण कोरोनामुक्त झालो'',

कोट

माझी मुलगी धनश्री (वय २१) हिला प्रथम कोरोनाचा त्रास झाला. ताप अधिक असल्याने कोरोनाचा संशय आला. सगळ्यात शेवटी मी दाखल झालो. मी आधी दाखल झालो असतो तर सर्वच कुटुंबीय खचले असते. सर्वजण एकाच रुग्णालयात असल्याने थोडा एकमेकांना धीर होता. वय जास्त असल्यामुळे आईची जास्त काळजी होती. मात्र मी घरातील कर्तापुरुष यामुळे मी माझ्या काळजावर दगड ठेऊन सर्वांना धीर दिला आणि सकारात्मक राहिलो. यामुळे पाचही जण कोरोनातून मुक्त झाले. आता सर्वजण रुग्णालयातून सुखरूप घरी आलो आहोत.

- चंद्रकांत वारघडे, बकोरी

मुळात अशी वेळ कोणत्याही कुटुंबावर येऊ नये. त्रास जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. घाबरून जाऊ नका. खूप सकारात्मक रहा. अन्य कुटुंबीय व मित्रांनीही खूप आधार दिला. यामुळे कोरोनातून मुक्त झालो. सर्वाना कळकळीची विनंती आहे. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा वापर करा. असा मोलाचा सल्ला देखील चंद्रकांत वारघडे यांनी दिला आहे.

Web Title: We did not lose, we fought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.