Raj Thackeray: आम्हाला शांतता भंग करायची नाही; मुस्लिम बांधवानी ऐकावे, राज ठाकरेंचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 12:13 PM2022-04-17T12:13:51+5:302022-04-17T12:14:34+5:30
पाच वेळा भोंगे लावणार असाल तर दिवसातून पाच वेळा मशिदीसमोर आम्ही हनुमान चालीसा लावू
पुणे : गुढीपाडवा आणि ठाण्यातील राज ठाकरेंच्या भाषणानंतर राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय घडामोडी बरोबरच त्यांनी धार्मिक मुद्द्यालाही हात घातला आहे. मशिदीवरील भोंगे काढून टाकावेत यावर ठाकरे ठाम आहेत. तर ३ मे पर्यंत भोंगे काढण्याचा अल्टिमेटम राज यांनी दिला आहे. राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. काल हनुमान जयंतीनिमित्त राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती आणि हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज या सर्व मुद्द्यांवर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद झाली.
ठाकरे म्हणाले, भोंग्यांचा हिंदूंना त्रास होतोय अस नाही. पाच वेळा भोंगे लावणार असाल तर दिवसातून पाच वेळा मशिदीसमोर आम्ही हनुमान चालीसा लावू. महाराष्ट्रात व देशात आम्हाला दंगली नको. शांतता भंग करायची नाही. मुस्लिम बांधवाना वाटत असेल तर आम्ही ते करू. त्यांनी प्रामाणिकपणे भांगे कडून टाकावेत. मुस्लिम बांधवानी आमचे ऐकवे आणि भोंगे काढून टाकावेत. नाहीतर आम्ही मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू.
राज ठाकरेंच्या दोन मोठया घोषणा
महाराष्ट्र दिनी संभाजीनगर येथे जाहीर सभा घेणार आहे. तर पाच जूनला सहकार्यांसोबत अयोध्येला जाणार आहे अशा मोठ्या दोन घोषणा ठाकरे यांनी केल्या आहेत.