महागाईविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:10 AM2021-07-26T04:10:47+5:302021-07-26T04:10:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्याचा सर्वाधिक फटका असंघटित कामगारांना बसला आहे. त्यामुळे यापुढील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्याचा सर्वाधिक फटका असंघटित कामगारांना बसला आहे. त्यामुळे यापुढील काळात महागाईविराेधात रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेचे सरचिटणीस शरद पंडित यांनी केले.
महाराष्ट्र असंघटित कामगार संघटेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
वर्धापनदिनानिमित्त संघटनेने गेल्या दोन वर्षात केलेल्या कामाचा लेखा जोखा प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडला होता. कार्यअहवालाचे प्रकाशन समर्थ मंडळाचे अध्यक्ष भगवानराव देशपांडे, कामगार नेते, नितीन पवार, सतीश चिटणीस, मिना पंडित, उपाध्यक्ष स्मिता कोरडे, चिटणीस सुवर्णा कोंढाळकर, जिल्हाध्यक्ष उषा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. वर्धापनदिनानिमित्त अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
राज्य शासनाद्वारे मिळत असेल्या योजनांची माहिती, मदत सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रमुख कार्यकर्त यांनी ग्रामीण भागात जाऊन शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पंडित यांनी सांगितले.