ज्ञानाशी निष्ठा ठेवणारी शिक्षण व्यवस्था हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:10 AM2020-12-08T04:10:38+5:302020-12-08T04:10:38+5:30
डॉ. रामचंद्र देखणे : पाटील, हर्डीकर यांना ''''''''डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार'''''''' प्रदान लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “शिक्षक ...
डॉ. रामचंद्र देखणे : पाटील, हर्डीकर यांना ''''''''डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार'''''''' प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “शिक्षक ज्ञानदानातून विद्यार्थी घडविण्याचे मोठे काम करत असतात. त्यांना प्रतिष्ठा देणारी आणि ज्ञानाशी निष्ठा ठेवणारी शिक्षण व्यवस्था निर्माण व्हायला हवी,” असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले.
साहित्यिक बाबा भारती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व महाराष्ट्र विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी डॉ. देखणे बोलत होते. साने गुरुजी साहित्यनगरीत झालेल्या या संमेलनात ज्येष्ठ जलतज्ज्ञ इंजि. अनिल पाटील व ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मदन हर्डीकर यांना ''''''''डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार'''''''' प्रदान करण्यात आला.
यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, संमेलनाध्यक्ष प्राचार्य प्रा. प्रदीप कदम, कवी चंद्रकांत वानखेडे, माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रकाश जवळकर, संयोजक महेंद्र भारती, प्रा. वैभव पताळे, शंकर आथरे आदी उपस्थित होते. गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात प्रा. राजेंद्र कांबळे यांचा सन्मान करण्यात आला.
प्रकाश रोकडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अमोल कवडे यांनी आभार मानले.