एमपीएससीच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता हवी : अंकिता पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:10 AM2021-03-15T04:10:52+5:302021-03-15T04:10:52+5:30

पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांबाबत पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हा परिषद सदस्या व ...

We need transparency in MPSC exams: Ankita Patil | एमपीएससीच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता हवी : अंकिता पाटील

एमपीएससीच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता हवी : अंकिता पाटील

googlenewsNext

पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांबाबत पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्मा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील यांची भेट घेतली व परीक्षेच्या बाबतीतील समस्या मांडल्या.

पुढे बोलताना अंकिता पाटील म्हणाल्या की, रविवार (दि.१४) मार्च रोजी ही परीक्षा होणार होती परंतु सरकारने ऐनवेळी ही परीक्षा रद्द केली. विद्यार्थ्यांचा विरोध- आक्रोश पाहून व आपण केलेली मागणी लक्षात घेता सरकारने ही परीक्षा २१ मार्च रोजी घेण्याचे ठरवले आहे. परंतु अनेक मुलांनी येण्या-जाण्यासाठी तसेच राहण्यासाठी व प्रवासाकरिता बुकिंग ही केल्या होत्या ते आता त्यांना रद्द कराव्या लागल्या आहेत व जे कोणीही विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. त्यांना २१ तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास होत आहे.

१४ इंदापूर

स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्याशी संवाद साधला.

Web Title: We need transparency in MPSC exams: Ankita Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.