सदैव सैनिकाबद्दल कृतज्ञ राहिले पाहिजे : जगदाळे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:10 AM2021-02-07T04:10:23+5:302021-02-07T04:10:23+5:30
करडे (ता. शिरूर) येथील दादासाहेब चंद्रकांत जगदाळे हे लष्करी सेवेतून निवृत झाल्याने आयोजित सन्मान समारंभात ते बोलत होते. ...
करडे (ता. शिरूर) येथील दादासाहेब चंद्रकांत जगदाळे हे लष्करी सेवेतून निवृत झाल्याने आयोजित सन्मान समारंभात ते बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, लंघेवाडीचे सरपंच संतोष लंघे, करडे गावचे सरपंच सुनील इसवे, माजी उपसरपंच संतोष घायतडक, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष दत्ता देशमुख, अखिल पुणे जिल्हा प्राथमिक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव वाळके, सैनिक संघटनेचे पदाधिकारी नंदकुमार रोडे, अरुण जगदाळे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. हवालदार दादासाहेब चंद्रकांत जगदाळे हे तब्बल २२ वर्षांच्या लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यामुळे विविध संस्था व संघटनांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. सुभाष गवारी, सैनिक माता हौसाबाई जगदाळे, पत्नी सीमाताई जगदाळे, भाऊ शरद जगदाळे यांसह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ, आजी -माजी सैनिक उपस्थित होते.
आभार सीमाताई जगदाळे यांनी व्यक्त केले.
सेवानिवृत्त सैनिक हवालदार दादासो जगदाळे यांची ग्रामस्थांनी काढलेली मिरवणू्क.