डिग्री, नाेकरी, छाेकरी ची मानसिकता बदलायला हवी : विनाेद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 04:55 PM2018-07-02T16:55:25+5:302018-07-02T16:57:12+5:30

एकाच पद्धतीची शिक्षणपद्धती साेडून शिक्षणाबराेबरच काैशल्याचा अंगिकार विद्यार्थ्यांनी करावा असे मत शिक्षण मंत्री विनाेद तावडे यांनी व्यक्त केले. we should change our mentality regarding education : vinod tawade

we should change our mentality regarding education : vinod tawade | डिग्री, नाेकरी, छाेकरी ची मानसिकता बदलायला हवी : विनाेद तावडे

डिग्री, नाेकरी, छाेकरी ची मानसिकता बदलायला हवी : विनाेद तावडे

Next

पुणे : डिग्री, नाेकरी, छाेकरी ची मानसिकता अाता बदलायला हवी. एकाच पद्धतीची शिक्षणपद्धती साेडून शिक्षणाबराेबरच काैशल्याचा अंगिकार विद्यार्थ्यांनी करावा असे मत शिक्षण मंत्री विनाेद तावडे यांनी व्यक्त केले. तसेच भारतात माेठ्याप्रमाणवर तरुण वर्ग असून त्यांना जगभरात अनेक संधी असल्याचेही ते यावेळी म्हणाले. सिंबायाेसिस कला व वाणिज्य माहविद्यालयाच्या तिसऱ्या पदवी प्रदान साेहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बाेलत हाेते. यावेळी सिंबायाेसिसचे संस्थापक डाॅ. शां.ब. मुजमदार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर, सिंबायाेसिसच्या संचालिका डाॅ. विद्या येरवडेकर, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. हृषिकेश साेमण अादी उपस्थित हाेते. 


    विनाेद तावडे यांनी अापल्या मनाेगतात पुणे विद्यापीठाच्या गीताचा अाधार घेत शिक्षणाबराेबरच इतर कलागुणांचा अंगीकार करायला हवा याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तावडे म्हणाले, अापण एकाच प्रकारचे विद्यार्थी घडवत अाहाेत. त्यामुळे शिक्षणपद्धतीमध्ये बदल करण्याची गरज अाहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबराेबरच विविध काैशल्याचा अंगिकार करायला हवा. एखाद्याला नासामध्ये संधी मिळाली अाणि दुसरा एखाद्या पाड्यावर जाऊन अापल्या शिक्षणाचा उपयाेग तेथील लाेकांचे अायुष्य सुकर करण्यासाठी करत असेल तर माझ्यासाठी दाेघेही सारखे गुणवान अाहेत. शिक्षण हे केवळ डिग्री, नाेकरी, अाणि लग्नासाठी मिळवायचे असते, ही चालत अालेली मानसिकता अापल्याला बदलायला हवी. तावडे यांनी साेनम वांगचूक यांचे उदाहरणही यावेळी दिले. तसेच अापण जे शिकताेय त्याचा उपयाेग सामान्य व्यक्तींसाठी कसा हाेईल याचाही विचार विद्यार्थ्यांनी करायला हवा असेही ते यावेळी म्हणाले. 


     मुजुमदार म्हणाले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंदादा पाटील हे इयत्ता सातवी पर्यंत शिकले हाेते, परंतु त्यांच्याकडे शिक्षणाबद्दलची दूरदृष्टी हाेती. सरकार जास्तीत जास्त महाविद्यालये उभारु शकत नाही म्हणून वसंतदादांनी शिक्षणाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अनेक खासगी संस्थांना महाविद्यालय सुरु करण्याची परवानगी दिली. सध्या मानवता अाणि विज्ञान एकत्र अाणण्याची गरज अाहे. नवनवीन शाेधांसाठी विद्यार्थ्यांनी अापल्या मेंदूला तयार करायला हवे. तुमच्यात एखादी गाेष्ट मिळविण्याची तीव्र इच्छा असायला हवी. ती नसेल तर तुम्ही काहीच करु शकणार नाही.
 

Web Title: we should change our mentality regarding education : vinod tawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.