अशा सत्तेवर आम्ही थुंकतो, भाजपा हा चार टोळक्यांचा पक्ष : संजय राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 05:00 AM2017-10-03T05:00:56+5:302017-10-03T05:02:20+5:30
भाजपा शिवसेनेला खतम करण्याचा प्रयत्न करीत आहे; परंतु जो हा प्रयत्न करील, तोच संपेल. शिवसेना कधीही सत्तेतून बाहेर पडेल. सध्याची सत्ता तात्पुरती आहे, अशा सत्तेवर आम्ही थुंकतो़ भाजपा हा चार टोळक्यांचा पक्ष आहे़
नारायणगाव : भाजपा शिवसेनेला खतम करण्याचा प्रयत्न करीत आहे; परंतु जो हा प्रयत्न करील, तोच संपेल. शिवसेना कधीही सत्तेतून बाहेर पडेल. सध्याची सत्ता तात्पुरती आहे, अशा सत्तेवर आम्ही थुंकतो़ भाजपा हा चार टोळक्यांचा पक्ष आहे़, अशी थेट टीका शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी नारायणगाव येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात केली.
या मेळाव्यात राऊत यांनी भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षावर टीका केली़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करून पुढील काळात स्वबळावर निवडणूक लढविणार, असे वक्तव्य केले़ या वेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार सुरेश गोरे, जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, उपसहसंपर्क प्रमुख अविनाश रहाणे, शिवसेनेच्या गटनेत्या आषाताई बुचके, जि़. प. सदस्य गुलाब पारखे, देवराम लांडे, उद्योजक बाजीराव दांगट, सुरेश भोर, शरद चौधरी, माऊली खंडागळे, अरुण गिरे, गणेश कवडे, जयश्री पलांडे, उपसभापती दिलीप डुंबरे, पंचायत सभापती ललिता चव्हाण, संतोश खैरे, स्मिता विटे, विजया शिंदे, सुलभा उबाळे, हिराताई चव्हाण, बाळासाहेब पाटे, आनंद रासकर व शिवसैनिक उपस्थित होते़
राऊत पुढे म्हणाले, की शिवसेना मुंबईत बुलेट टेÑन येऊ देणार नाही़ त्याला शिवसेनेचा विरोध राहील़ शिवसेना संपविण्याचे स्वप्नही बुलेट टेÑनसारखे आहे़, अशी टीका करून ते म्हणाले, की सध्या केंद्र शासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करणार आहेत़ शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांची आज दुरवस्था झालेली असून शिवसेनेत गद्दारांना स्थान नाही़
येत्या विधानसभेत १४५ पेक्षा जास्त आमदार निवडून येतील. जुन्नर तालुक्यात या वेळी भगवा फडकावणारच़ तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातून ४ आमदार निवडून आणू, असे राऊत म्हणाले.
खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील म्हणाले, की भाजपाने स्वप्न दाखविले़
शेतकरी कोसळला गेला़ देशाची परिस्थिती वाईट झाली आहे़ नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे़ आशाताई बुचके, माऊली खंडागळे यांनी आपले विचार व्यक्त केले़ हेमंत कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश कवडे यांनी आभार मानले.