आम्ही तुमची मालिका ‘आई माझी काळुबाई’ रोज बघतो; महिला कैद्यांशी संवाद साधताना अलका कुबल भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 12:47 PM2023-05-26T12:47:48+5:302023-05-26T12:48:03+5:30

अलका कुबल यांनी आपल्यातला मोठेपणा बाजूला ठेवून एका मोठ्या बहिणीच्या नात्याने सर्व भगिनींशी संवाद साधला

We watch your serial Aai Majhi Kalubai everyday Alka Kubal emotional while interacting with women prisoners | आम्ही तुमची मालिका ‘आई माझी काळुबाई’ रोज बघतो; महिला कैद्यांशी संवाद साधताना अलका कुबल भावूक

आम्ही तुमची मालिका ‘आई माझी काळुबाई’ रोज बघतो; महिला कैद्यांशी संवाद साधताना अलका कुबल भावूक

googlenewsNext

पुणे: ‘आम्ही तुमची मालिका ‘आई माझी काळुबाई’ रोज बघतो. तुमच्यामध्ये आम्ही आमच्या कुलदेवतेला पाहतो. आम्ही इथून लवकर बाहेर पडून आमच्या कुटुंबीयांसमवेत राहावे, अशी प्रार्थना आम्ही तुमच्याकडे काळुबाई म्हणूनच करतोय. तुम्ही ती काळुबाईपर्यंत पोहोचवा...’ असे एका भगिनीने सांगताच रडण्याचा अभिनय करणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल यांना खरोखरच रडू आले. त्यांनी त्या भगिनीला जवळ घेतले. तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सर्व भगिनींसाठी आणि त्यांच्या सुखी आयुष्यासाठी त्यांच्यासमोरच आई काळुबाईची प्रार्थना केली. यावेळी महिलांसोबतच खाकी वर्दीतील अधिकाऱ्यांच्या डोळ्यातसुद्धा अश्रू तरळले. निमित्त होते येरवडा कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान व आदर्श मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रेरणापथ उपक्रमांतर्गत अभिनेत्री अलका कुबल यांच्या स्नेहसंवादाचे.

अलका कुबल यांनी आपल्यातला मोठेपणा बाजूला ठेवून एका मोठ्या बहिणीच्या नात्याने सर्व भगिनींशी संवाद साधला. जिद्द, परिश्रम आणि कष्ट यावर विश्वास असेल तर तुम्ही सर्व संकटांना तोंड देऊ शकता. रागाच्या भरात नकळत एखादी चूक घडते आणि आपल्याला या ठिकाणी यावे लागते. पण यावर मात करून तुम्ही पुढचा विषय ताठ मानाने आणि सन्मानाने जगा. यासाठी तुम्हाला जी काही लागेल मदत लागेल ती भोई प्रतिष्ठानच्या माध्यमातून करायला मी तयार आहे, असे अलका कुबल यांनी सांगताच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

यावेळी महिला बंदीवानांनी भारुड, गीते तसेच ‘माहेरची साडी’ या चित्रपटातील संवाद अलकाताई यांच्यासमोर सादर केले. कारागृहाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कारागृहामध्ये या महिलांना भावनिक व मानसिक आधार देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने आयोजित करण्यात येत असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रेरणा पथ प्रकल्पाचे समन्वयक डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले. यावेळी महिला कारागृहाचे अधीक्षक अनिल खामकर, उपअधीक्षक पल्लवी कदम, तुरुंग अधिकारी तेजश्री पोवार आदी उपस्थित होते.

Web Title: We watch your serial Aai Majhi Kalubai everyday Alka Kubal emotional while interacting with women prisoners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.