गावातील विकासकामे प्राधान्याने मार्गी लावू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:13 AM2021-08-26T04:13:31+5:302021-08-26T04:13:31+5:30
शेलपिंपळगाव : गावातील विकासकामांसाठी निधी मंजूर करून आवश्यक सर्व कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील, अशी ग्वाही आमदार दिलीप मोहिते ...
शेलपिंपळगाव : गावातील विकासकामांसाठी निधी मंजूर करून आवश्यक सर्व कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील, अशी ग्वाही आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली.
वडगाव-घेनंद (ता. खेड) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते-पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या दीपाली काळे, पंचायत समिती सदस्य अरुण चौधरी, खेड तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुजाता पाचपिंड, खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष ऋषिकेश पवार, सरपंच शशिकला घेनंद, उपसरपंच उज्ज्वला घेनंद, माजी उपसरपंच संतोष यादव, हेमा घेनंद, ग्रामपंचायत सदस्य संतोष गांधिले, विठ्ठल थोरात, नीता घेनंद उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हा परिषद नवीन इमारतीच्या कामासाठी गावातील ग्रामस्थांनी व शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित लोकवर्गणी जमा केली आहे. गावातील उपलब्ध लोकवर्गणी, आमदार निधी, पुणे जिल्हा परिषद निधी तसेच अन्य दानशूर व्यक्तींच्या पुढाकारातून शाळेच्या वर्गखोल्यांचे काम मार्गी लावले जाणार आहे.
२५ शेलपिंपळगाव
वडगाव-घेनंद (ता. खेड) येथील जिल्हा परिषद नूतन इमारतीचे भूमिपूजन करताना दिलीप मोहिते पाटील, निर्मला पानसरे व ग्रामस्थ.