...ताेपर्यंत मंचावरचे आम्ही काेणीच पाणी पिणार नाही : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 01:44 PM2019-06-23T13:44:16+5:302019-06-23T13:48:47+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना 16 हजार सातशे 31 कडुलिंबाची राेपे वाटण्याचा विश्वविक्रम करण्यात आला. या दरम्यान विद्यार्थ्यांना पाणी देण्यात न आल्याने विद्यार्थ्यांची कुजबुज सुरु हाेती. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना धीर दिला.

We will not drink water unless you get it : Chandrakant Patil | ...ताेपर्यंत मंचावरचे आम्ही काेणीच पाणी पिणार नाही : चंद्रकांत पाटील

...ताेपर्यंत मंचावरचे आम्ही काेणीच पाणी पिणार नाही : चंद्रकांत पाटील

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये स्वच्छ वारी,स्वस्थ वारी, निर्मल वारी हरित वारी महाभियान अंतर्गत 16731कडुलिंब रोपांचे राष्ट्रीय सेवा योजना च्या विद्यार्थ्यांना वाटप करत विश्वविक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे हाेते. सकाळी 9 वाजल्यापासून या विश्वविक्रमाची तयारी करण्यात येत हाेती. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डच्या नियमावली नुसार पर्यावरणाचा उपक्रम असल्याने विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या विक्रम सुरु असताना देता येणे शक्य नव्हते. मुख्य कार्यक्रम 11.30 च्या सुमारास सुरु झाला. विश्वविक्रम हाेईपर्यंत विद्यार्थ्यांना पाणी देण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून पाण्याची मागणी करण्यात येत हाेती. पाटील मनाेगतास उभे राहताच त्यांनी मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मला माहिती आहे की तुम्हाला पाणी हवं आहे. जाेपर्यंत विश्वविक्रमाची नाेंद हाेऊन तुम्हाला पाणी पिता येणार नाही ताेपर्यंत मंचावरचे काेणीच पाणी पिणार नाही असे म्हणत पाटील यांनी विद्यार्थ्यांना धीर दिला. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून स्वच्छ वारी,स्वस्थ वारी, निर्मल वारी हरित वारी महाभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत विविध महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा याेजनेच्या 16 हजार सातशे 31 विद्यार्थ्यांना कडुलिंबाच्या राेपांचे वाटप करण्यात आले. ही राेपे विद्यार्थी वारीच्या मार्गावर तसेच आपआपल्या परिसरात लावणार आहेत. इतकी राेपे एकसाथ वाटण्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नाेंद घेण्यात आली. सकाळपासूनच विद्यार्थी या विश्वविक्रमासाठी विद्यापीठाच्या मैदानावर आले हाेते. विश्वविक्रमाच्या नियमानुसार प्लाॅस्टिकची वस्तू वापरता येणार नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना विश्वविक्रम सुरु असताना पाणी देणे शक्य नव्हते. परंतु तीन तास विद्यार्थी मैदानावर बसलेले असल्याने विद्यार्थ्यांना तहाण लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून सातत्याने पाण्याची मागणी करण्यात येत हाेती. ही बाब पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी मनाेगताला उभे राहताच विद्यार्थ्यांना धीर दिला. तसेच विश्वविक्रमाची नाेंद हाेईपर्यंत मंचावरचे मान्यवर देखील पाणी घेणार नसल्याचे ते म्हंटले. 

मुख्यमंत्र्यांचा पुणे विद्यापीठात कार्यक्रमात गोंधळ, निवेदन देताना विद्यार्थ्यांना अडवले

विश्वविक्रमाची नाेंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या जागेवर पाणी देण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार, गिरीश बापट, संजय काकडे, आमदार मिलिंद कांबळे, मेधा कुलकर्णी, महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन कळमरकर आदी उपस्तिथ होते.
 

Web Title: We will not drink water unless you get it : Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.