आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही; जयंत पाटील स्पष्टंच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 08:40 PM2022-03-01T20:40:25+5:302022-03-01T20:40:41+5:30

अनिल देशमुख यांच्याबाबत जे घडलं नाही, ते दाखवायचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे

We will not resign the nawab malik Jayant Patil spoke clearly | आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही; जयंत पाटील स्पष्टंच बोलले

आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही; जयंत पाटील स्पष्टंच बोलले

googlenewsNext

पुणे : नवाब मलिक यांना तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. आता भाजपचे नेते आणि पदाधिकारी नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आम्ही राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्टंच सांगितलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने पुणे शहरातील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.  

पाटील म्हणाले, अनिल देशमुख यांच्याबाबत जे घडलं नाही, ते दाखवायचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. त्यामुळे आम्ही एक राजीनामा घेतला. ते रोज उठून एका मंत्र्यांमागे चौकशी करतील. अशा वेळी आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ असं नाही. आम्ही नवाब मालिकांचा राजीनामा घेणार नाही. आणि किरीट सोमय्या यांच्याबाबत आता तरी न बोललेलं बरं आहे. असंही ते यावेळी म्हणाले. 

अशा गोष्टी बोलणं टाळायला हवं

 महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना माहिती असून औरंगाबाद कोर्टाने देखील निर्णय दिला आहे. त्यामुळे जबाबदार पदावर असलेल्या राज्यपालांसारख्या व्यक्तीने अशा गोष्टी बोलणं टाळायला हवं, अशी वक्तव्ये करणं योग्य नसल्याचं जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

दुर्दैवाने एकाच मृत्यू झाला 

केंद्र सरकारने या मुलांना वाचवण्यास उशीर केला असून त्यांनी मुलांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यावर लक्ष दिलं पाहिजे. दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता अनेक पालक आणि मुलांशी बोलणं सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे. 

Web Title: We will not resign the nawab malik Jayant Patil spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.