सीएए कायदा मागे घेतल्याशिवाय आंदाेलन थांबविणार नाही : यशवंत सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 08:13 PM2020-01-09T20:13:33+5:302020-01-09T20:15:02+5:30

यशवंत सिन्हा यांच्याकडून गांधी शांती यात्रेचे आयाेजन करण्यात आले असून या यात्रेच्या माध्यमातून सीएए कायदा मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

we will not withdraw agitation unless removation of CAA act : yashwant sinha | सीएए कायदा मागे घेतल्याशिवाय आंदाेलन थांबविणार नाही : यशवंत सिन्हा

सीएए कायदा मागे घेतल्याशिवाय आंदाेलन थांबविणार नाही : यशवंत सिन्हा

Next

पुणे : नागरिकत्व संशाेधन कायदा ( सीएए) हा गैरसंविधानिक कायदा असून काळा कायदा आहे. या कायद्याच्या विराेधात आम्ही गांधी शांती यात्रा महाराष्ट्रातून सुरु केली आहे. ही यात्रा भारताच्या विविध राज्यांमधून दिल्लीतील राज घाटावर जाणार आहे. सरकारने सीएए हा कायदा मागे घ्यावा अन्यथा आम्ही राजघाटावर आंदाेलन सुरु ठेवणार आहाेत असा निर्धार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केला. पुण्यात गांधीभवन येथे आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी खासदार शत्रुघ्न सिन्हा, माजी मुख्यंमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार आशिष देशमुख, गांधीभवनचे प्रमुख डाॅ. कुमार सप्तर्षी उपस्थित हाेते. 

राष्ट्रमंच, फ्रेंड ऑफ डेमोक्रसी, शेतकरी जागर मंच या संघटनांकडून गांधी शांती यात्रा काढण्यात आली आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून या यात्रेला सुरुवात झाली. आज ही यात्रा पुण्यातील गांधी भवन येथे आली. यावेळी सिन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिन्हा यांनी सरकारवर जाेरदार टीका केली. ते म्हणाले, देशात आज अशांती आहे. सीएए या कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. या कायद्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. याच्या विराेधात युवक रस्त्यावर उतरले आहेत. देशातील विद्यापीठ आंदाेलनाची केंद्रे बनली आहेत.विद्यार्थ्यांच्या आंदाेलनांचं दमण भाजप शासित राज्यांमध्ये हाेत आहे. गांधींच्या विचारांच्या विपरीत सरकार काम करत आहे. त्यामुळे आम्ही ही यात्रा काढण्याचा निर्णय घेतला.

Web Title: we will not withdraw agitation unless removation of CAA act : yashwant sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.