रस्तादुरुस्तीसाठीचा निधी उपलब्ध करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:11 AM2021-03-08T04:11:12+5:302021-03-08T04:11:12+5:30
माले आखाडेवस्ती या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या जोड रस्त्यासाठी माजी सभापती व पंचायत समिती सदस्य कोमल वाशिवले ...
माले आखाडेवस्ती या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या जोड रस्त्यासाठी माजी सभापती व पंचायत समिती सदस्य कोमल वाशिवले यांनी चार लाख रुपये एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच जिल्हा परिषद शाळा माले रामवाडी दुरुस्तीसाठीसाठी दोन लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून या कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले. त्या वेळी मांडेकर बोलत होते.
गावांमध्ये विविध विकासकामे चालू असल्याची माहिती सरपंच सोनल शेंडे यांनी दिली.
गावातील मुख्य रस्ता पाणी योजना अंतर्गत गटारे, स्वच्छता यासाठी आवश्यक असलेल्या निधीची उपलब्धता ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आमच्या गावासाठी व्हावी अशी मागणी उपसरपंच नितीन मारणे यांनी केली.
यावेळी माजी सरपंच अनिल आधवडे, निवृत्ती गायकवाड, हनुमंत ठकोरे, राहुल वाघमारे, बाळू आखाडे, प्रकाश आखाडे, वैभव कडू, सचिन जाधव, दिलीप वाघमारे, रविंद्र आधवडे, किसन आधवडे, अण्णा आखाडे, सुनिल आखाडे, अमोल आखाडे, महिंद्र काळोखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामसेवक प्रशांत सूर्यवंशी यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.
---------------
फोटो : माले ता. मुळशी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन प्रसंगी उपस्थित जि. प. सदस्य शंकर मांडेकर उपसभापती विजय केदारी, सरपंच सोनल शेंडे, उपसरपंच नितीन मारणे व अन्य पदाधिकारी.