कोरोनाचे नियम न पाळल्यास कारवाई करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:12 AM2021-05-19T04:12:11+5:302021-05-19T04:12:11+5:30
न्हावरे : शहरांंप्रमाणे ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवर देखील कोरोनाच्या रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे तरी ...
न्हावरे : शहरांंप्रमाणे ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवर देखील कोरोनाच्या रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे तरी नागरिकांनी अत्यावश्यक कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडू नका अन्यथा कुणाचीही गय न करता कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा शिरुर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिला.
न्हावरे (ता. शिरूर) येथे वाढत्या कोरोना रूग्ण संख्येला आळा बसवा यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी उपनिरीक्षक सुनिल मोटे, तलाठी माधव बिराजदार, सरपंच अलका शेंडगे, माजी जि. प. सदस्य वसंतराव कोरेकर, शिरूर तालूका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागरराजे निंबाळकर, माजी सरपंच गौतम कदम, कमल कोकडे, राजेंद्र कोरेकर, भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कांडगे, कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कांगुणे, माजी उपसरपंच संभाजी बिडगर, प्रवीण राऊत, ग्रामपंचायत सदस्य उत्तम कदम, संदीप यादव, समीर कोरेकर, संभाजीराव कुटे, बाबा नागवडे, बाळासाहेब जाधव, बिरा शेंडगे, दत्ता शेंडगे आदी उपस्थित होते.
गट-तट विसरून कोरोनाच्या संकटावर सर्वांनी मात करा. जे दकानदार दिलेली वेळ पाळत नसतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून दुकान सील करणार असल्याचे ही पोलीस निरीक्षक खानापुरे यांनी यावेळी सांगितले.
--
फोटो १८ न्हावरे प्रबोधन पोलीस
फोटो : न्हावरे येथील बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे.