कचरा डेपोसंदर्भात ग्रामस्थांशी चर्चा करणार

By admin | Published: May 1, 2017 03:23 AM2017-05-01T03:23:19+5:302017-05-01T03:23:19+5:30

पुण्याच्या कचरा डेपोचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, जागेची समस्या आहे. उरूळी कांचन आणि फुरसुंगी येथे काम दिलेली

We will talk to villagers about the garbage depot | कचरा डेपोसंदर्भात ग्रामस्थांशी चर्चा करणार

कचरा डेपोसंदर्भात ग्रामस्थांशी चर्चा करणार

Next

पुणे : पुण्याच्या कचरा डेपोचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, जागेची समस्या आहे. उरूळी कांचन आणि फुरसुंगी येथे काम दिलेली कंपनी काम अर्धवट सोडून निघून गेली आहे. फुरसुंगी संदर्भात न्यायालय आणि हरित न्याय प्राधिकरणाकडून निकाल आलेले आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेतल्यानंतर ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे पालममंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
आपण यापूर्वीही अनेकदा तेथे भेटून पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली आहे. महापौर मुक्ता टिळक ग्रामस्थांची भेट घेणार आहेत. जो आहे तो प्रकल्प अधिक क्षमतेने सुरू ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही बापट यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थांशी यासंदर्भात बोलावे लागेल, कारण नवीन जागा आणि नवीन पर्यायाचा विचार करता पुन्हा न्यायालयीन प्रक्रिया होऊ शकते असेही ते म्हणाले.
महापौरांच्या वक्तव्याबाबत त्यांनी खुलासा केला आहे. त्यावर अधिक बोलण्याची आवश्यकता नाही. आरक्षणाला भाजपाचा सुरुवातीपासूनच पाठिंबा आहे. परदेशात गेलेल्यांना आपल्या देशात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असून, त्यांनी या देशात राहून सेवा करावी यासाठी प्रयत्न करायला हवेत असेही बापट म्हणाले.

Web Title: We will talk to villagers about the garbage depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.