आमची अडचण होतेय! पुण्यातील वसंत मोरे दबक्या आवाजात बोलले; मनसैनिक संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 12:37 PM2022-04-05T12:37:32+5:302022-04-05T13:25:55+5:30

वसंत मोरे एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, राज ठाकरे नेमकं काय बोलले हे कार्यकर्तांना समजलेलचं नाही.

We will try our best to maintain peace in our region, said MNS Pune city president Vasant More | आमची अडचण होतेय! पुण्यातील वसंत मोरे दबक्या आवाजात बोलले; मनसैनिक संभ्रमात

आमची अडचण होतेय! पुण्यातील वसंत मोरे दबक्या आवाजात बोलले; मनसैनिक संभ्रमात

Next

पुणे- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आघाडीवर टिकाही केली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

राज ठाकरेंनी शनिवारच्या भाषणात राजकीय घडामोडींबरोबर, धार्मिक विषयांना हात घातला आहे. मशीदींवरील भोंगे उतरविले पाहिजेत. अन्यथा त्यांच्यासमोर भोंग्यावर हनुमान चालीसा लावली जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. 

राज ठाकरेंच्या या विधानावरुन महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडून टीकाही होऊ लागली आहे. तर राज्यात कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे धाडस मनसैनिक करू लागले आहेत. त्यातच पुण्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. एका मुस्लिम पदाधिकाऱ्याने मनसे पक्षाला राजीनामा दिल्याचे पत्र नगरसेवक वसंत मोरे यांना पाठवले आहे. 

वसंत मोरे एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, राज ठाकरे नेमकं काय बोलले हे कार्यकर्तांना समजलेलचं नाही. राज ठाकरेंच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं वसंत मोरे म्हणाले. तसेच मी राज ठाकरे आणि पक्षावर नाराज नाही. मात्र माझ्या आणि मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लीम मतदार जास्त आहेत. त्याचा परिणाम निवडणुकीत होईल, असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं. 

वसंत मोरे पुढे म्हणाले की, मी माझ्या प्रभागात शांतता कशी राहील याचा प्रयत्न करणार. कोणीही वेगळा प्रयत्न करणार नाही. मात्र मलाच कळेना झाले आहे, मी काय भूमिका घ्यावी, असा संभ्रम वसंत मोरेंच्या बोलण्यातून दिसून आला. 

मुस्लिम पदाधिकारी काय म्हणाले-

मी माजिद अमीन शेख वॉर्ड क्रमांक ८४ शाखा अध्यक्ष प्रभाग क्रमांक १८ आपणास या पत्राद्वारे कळवत आहे कि, मागील काही दिवसात पक्षात विकास, बेरोजगारी, महागाई, शिक्षण, महिला सक्षमीकरण, हे मुद्दे सोडून जात - धर्म या विषयावर भर दिला जात आहे. या कारणास्तव मी माजिद अमीन शेख कोणाच्याही दबावाखाली न येता स्वइच्छेने पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या पदाचा राजीनामा स्वीकारून याची पोहोच द्यावी हि विनंती असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.   

Web Title: We will try our best to maintain peace in our region, said MNS Pune city president Vasant More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.