Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्र्रात विधानसभेला २०० च्या वर जागा जिंकू! कार्यकर्त्यांनो घरोघरी जाऊन काम करा

By श्रीकिशन काळे | Published: July 21, 2024 12:52 PM2024-07-21T12:52:01+5:302024-07-21T12:52:53+5:30

फिरसे जितने का हौसला रखते है हम...! चंद्रशेखर बावनकुळे यांचा आत्मविश्वास

We will win more than 200 seats in the Legislative Assembly in Maharashtra Workers go door to door and work | Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्र्रात विधानसभेला २०० च्या वर जागा जिंकू! कार्यकर्त्यांनो घरोघरी जाऊन काम करा

Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्र्रात विधानसभेला २०० च्या वर जागा जिंकू! कार्यकर्त्यांनो घरोघरी जाऊन काम करा

पुणे: येत्या निवडणुकीत विधानभवनावर भगवा फडकावायचा असेल, तर सर्वांनी घरोघरी जाऊन काम करावे. आपल्याला दोनशेच्यावर जागा मिळतील. मला घमंड नाही, तर आत्मविश्वास आहे. प्रत्येक बुथवर दहा मते वाढवा, आपला विजय निश्चित आहे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन बालेवाडीत आज सुरू आहे. त्यावेळी बावनकुळे यांनी प्रास्ताविक केले आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरचिटणीस विनोद तावडे, पियूस गोयल आदी पदाधिकारी उपस्थित आहेत. 

बावनकुळे म्हणाले, लोकसभेला आपल्याला अनेक जागांवर पराभव स्वीकारावा लागला. पण मतांची आकडेवारी पाहिली तर थोड्या मतांनी आपल्या अनेक जागा गेल्या. आता विधानसभेला प्रत्येक बुधवर दहा मते वाढविली तर आपला विजय निश्चित आहे. विधनसभेत आपल्याला चांगले यश मिळेल. विरोधकांनी खोटेपणा करून लोकसभेत आपल्याला पराभूत केले. पण आता त्या पराभवातून आपण शिकलो आहोत. त्यांचा खोटेपणा उघड झाला आहे. 
खरंतर मराठा समाजासाठी देवेंद्रजींनी रात्ररात्रं काम केलं आहे. मराठ्यांना आरक्षण दिले तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत. आज आंदोलन करताना देवेंद्रजी यांना टार्गेट केले जात आहे. मराठा आरक्षणाला आम्ही पाठिंबा देतोय. देवेंद्रजी यांनी जो कायदा केला, त्याचा मारेकरी शोधा. 

ओबीसीचे गेलेले काम एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी यांनी केले. निवडणुका झाल्या नाहीत, ते कोणामुळे थांबल्या. महाविकास आघाडीने पंचायत समितीच्या निवडणुका रोखल्या. गरीब कल्याण योजना ठाकरे सरकारने बंद केली. हे पाप ठाकरे सरकारने केले. ज्या दिवशी सरकार आले तेव्हापासून विकासाची २०-२० मॅच सुरू झालीय. 

उद्याचे महाविकास आघाडीला मत म्हणजे मोदींच्या योजना थांबविण्यासाठी असेल. म्हणून १४ कोटी जनतेला माझे आवाहन आहे की, असे करू नका. योजना बंद करू नका. आज घरोघरी जाऊन मोदी सरकारचे काम सांगायला हवे. लोकप्रिय योजना पुढे नेण्यासाठी काम करायचे आहे. मनात निराशा ठेवू नका. सर्वांनी नेटाने काम करावे. आपले नेते दणकट आहेत. कार्यकर्ता हा आपला श्वास आहे. इथून गेल्यावर प्रत्येक बुथवर जाऊन काम करायचे आहे. मतदार नोंदणी सुरू आहे.

आपण पदासाठी काम करत नाही. महायुतीचा निर्णय होईल. कोण लढेल ते वरिष्ठ ठरवतील. पण आपल्याला पक्षासाठी काम करायचे आहे. चार महिने पक्षावर, नेतृत्वावर श्रद्धा ठेवा आणि काम करा. या निवडणुकी आपण शिकलोय आणि पुढच्या निवडणुकीत जिंकणार आहोत. फिरसे जितने का हौसला रखते है हम, असा आत्मविश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Web Title: We will win more than 200 seats in the Legislative Assembly in Maharashtra Workers go door to door and work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.