पायी चालताना काळाचा घाला; एसटीच्या धडकेत मुलाचा मृत्यू, आळंदी पंढरपूर पालखी मार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 06:28 PM2024-10-17T18:28:10+5:302024-10-17T18:28:49+5:30

एसटी चालकाने हयगयीने वाहन चालवून १५ वर्षीय मुलाचा बळी घेतला व पुढे जाऊन ट्रॉलीलाही धडकला

Wear time when walking; Boy dies in collision with ST, incident on Alandi Pandharpur Palkhi Marg | पायी चालताना काळाचा घाला; एसटीच्या धडकेत मुलाचा मृत्यू, आळंदी पंढरपूर पालखी मार्गावरील घटना

पायी चालताना काळाचा घाला; एसटीच्या धडकेत मुलाचा मृत्यू, आळंदी पंढरपूर पालखी मार्गावरील घटना

नीरा (पुरंदर) : नीरा शहरातून जाणाऱ्या आळंदी पंढरपूर पालखी मार्गावर मुस्लिम दफनभुमी समोर भरधाव एसटी बसने युवकाला ठोकरल्याने तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तो मृत घोषित करण्यात आला. या अपघातात रोहित राजेंद्र जाधव (वय १५ वर्षे) हा मृत पावला आहे. एसटी चालकाला नीरा पोलिस दुरक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नीरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितच्या वडिलांनी गुरवारी दुपारी फिर्याद दाखल केली. फिर्यादी नुसार बुधवारी रात्री १०.५० च्या सुमारास रोहित जाधव पुणे पंढरपूर पालखी मार्गावरून पायी चालत घरी चालला होता. मुस्लिम दफनभुमी समोर उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या डाव्या बाजूने जात असताना मागून भरधाव येणाऱ्या पिंपरी चिंचवड आगाराच्या एसटीने ने जोरदार धडक दिली. तसेच उभ्या ट्रॉलीला ही एसटी बस घासत गेली आहे. 

 या अपघातमध्ये रोहितच्या डाव्या हाताला, पायाला, छातीला व कमरेच्या भागाला लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. स्थानिक युवकांनी तातडीने आधी लोणंद व नंतर बारामतीच्या सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले. बस चालक बसवराज मधुकर बिराजदार रा. खालारी, ता. औसा, जिल्हा लातूर याच्या चुकीमुळे हा अपघात झाला आहे. त्यामुळे बिराजदार याच्या विरोधात हयगयीने वाहन चालवणे व मुलाच्या मृत्युस कारणीभूत असल्याने त्यांच्या विरोधात तसेच एसटी बस क्र. एम.एच. १४ बी.टी. ३१३६ व क्रमांक नसलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉली वर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बुधवारी नीरेचा आठवडे बाजार असतो. बाजार तळावर जागा मोकळी असतानाही विक्रेते रहदारीच्या पालखी मार्गावर दुकाने थाटून बसतात. रात्रीच्या आठ वाजेपर्यंत रस्त्यावर बाजारकरुंची रेलचेल असते. या भागात रस्त्याला उतार आहे, पर्यायाने वाहने वेगात जाता. माध्यमांनी वेळोवेळी हीबाब लक्षात आणून दिली आहे, पण पोलीस व ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असते. 

Web Title: Wear time when walking; Boy dies in collision with ST, incident on Alandi Pandharpur Palkhi Marg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.