Weather Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 07:08 PM2021-06-24T19:08:33+5:302021-06-24T19:09:07+5:30
कोकण, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा
पुणे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारी जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या २४ तासात कोकणातील लांजा ११०, खेड, सावंतवाडी ९०, पेडणे ८०, मंडणगड, वाल्पोई ७०, दापोली, वैभववाडी ६०, चिपळूण, माणगांव, रत्नागिरी ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच बहुतांश ठिकाणी हलका पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात इगतपुरी ११०, गगनबावडा, महाबळेश्वरे ५०, बोदवड ४०, बार्शी, लोणावळा, पारोळा, रावेर ३० मिमी पाऊस झाला. तसेच काही ठिकाणी हलका पाऊस पडला. मराठवाड्यातील आष्टी, भोकरदन, चाकूर, जाफराबाद, कैज, वाशी ३०, कळंब २० मिी पाऊस झाला. विदर्भातील तुमसर ८०, मोहाडी ७०, एटापल्ली, लाखंदूर ४०, अहीरी, भंडारा, लाखनी, पौनी, रामटेक ३०, भामरागड, बुलढाणा, देऊळगाव राजा, गोंदिया, गोंदिया एपी, गोंड पिंपरी, कुही, कुरखेडा, मौदा, मेहकर, मोताळा, मुलचेरा, पर्सोनी, साकोली, सावनेर २० मिमी पावसाची नोंद झाली होती. घाटमाथ्यावरील दावडी ६०, डुंगरवाडी, ताम्हिणी, भिरा ५० मिमी पाऊस झाला आहे.
गुुरुवारी सायंकाळपर्यंत महाबळेश्वर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, मुंबई, सांताक्रूझ, डहाणु, औरंगाबाद, अकोला, अमरावती, ब्रम्हपूरी, वर्धा येथे पावसाच्या हलक्या सरी आल्या होत्या.
शुक्रवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी २५ व २६ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.