वाघीरे महाविद्यालयात अर्थ संकल्पावर वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:11 AM2021-02-07T04:11:25+5:302021-02-07T04:11:25+5:30
प्रा. कुलकर्णी यांनी अर्थसंकल्पाची रूपरेषा, तो तयार करण्याची प्रक्रिया, त्यातील विविध संकल्पना आणि नुकताच सादर झालेल्या आर्थिक वर्ष २०-२१ ...
प्रा. कुलकर्णी यांनी अर्थसंकल्पाची रूपरेषा, तो तयार करण्याची प्रक्रिया, त्यातील विविध संकल्पना आणि नुकताच सादर झालेल्या आर्थिक वर्ष २०-२१ च्या अर्थसंकल्पातील खर्च व उत्पन्न बाबींचे सविस्तर विश्लेषण केले. वन नेशन वन रेशन कार्ड, ब्ल्यू इकॉनॉमी, आत्मनिर्भर भारत, सरकारी कंपन्यांमधील निर्गुंतवणूक यासारख्या घटकांवर त्यांनी प्रकाश टाकला. 'सर्वसाधारण स्थितीत वित्तीय तूट ही ३ टक्के इतकीच असावी परंतू खर्चाचा विचार करता या वर्षाच्या अर्थसंकल्पात ही तूट १० टक्क्यांच्या जवळ आहे ही चिंतेची बाब असल्याचे मत त्यांनी मांडले'.
वेबिनारमध्ये माहाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी उपप्राचार्य डॉ. संपत जगदाळे, प्रा. डॉ. नाना झगडे, प्रा. अनिल झोळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विशाल पावसे यांनी केले. आभार प्रा. समीर कुंभारकर यांनी मानले.