मुलांना कोविड संकटापासून दूर ठेवण्यासाठी वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:11 AM2021-05-24T04:11:12+5:302021-05-24T04:11:12+5:30
योग्य औषधोपचारांसोबत, योग्य ज्ञान हेच कोविड संकटात शक्ती आहे. मागील काळात केवळ योग्य माहितीच्या अभावी किंवा चुकीच्या माहितीमुळे लोकांनी ...
योग्य औषधोपचारांसोबत, योग्य ज्ञान हेच कोविड संकटात शक्ती आहे. मागील काळात केवळ योग्य माहितीच्या अभावी किंवा चुकीच्या माहितीमुळे लोकांनी प्राण गमावले आहेत. योग्य माहिती तज्ज्ञांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जनजागृतीसाठी सरकारच्या प्रयत्नांना पूरक साथ देण्यासाठी आपण या खुल्या सत्राचे आयोजन केल्याचे आयोजक शाळेचे ट्रस्टी डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांनी सांगितले.
डॉ. मानकर यांनी या खुल्या सत्रात पालकांच्या सर्व शंकांचे सोप्या भाषेत निरसन केले. मुलांना संसर्ग होण्याच्या केसेस समोर येत असल्या तरीही फक्त अपवादात्मक केसेस या गंभीर स्वरूपाच्या आहेत असे त्यांनी सांगितले. नवजात बालक ते १२ वर्षांमधील मुलांना कोरोनाचा धोका हा किशोरवयीन वयोगटातील मुलांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. त्यामुळे घाबरून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले.