घोडेगाव महाविद्यालयात ‘ग्रामीण विकासाची शाश्वतता’वर वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:10 AM2021-03-08T04:10:33+5:302021-03-08T04:10:33+5:30
आपल्या उद्घाटन मनोगतात डॉ. शकुंतला काळे यांनी कृषीपूरक व्यवसाय, ग्रामीण पर्यटन इत्यादी विकासाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, ...
आपल्या उद्घाटन मनोगतात डॉ. शकुंतला काळे यांनी कृषीपूरक व्यवसाय, ग्रामीण पर्यटन इत्यादी विकासाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष अजित दत्तात्रय काळे म्हणाले की, या वेबिनारच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक व सामाजिक कार्यकर्ते एक वैचारिक प्रेरणा निश्चितपणे मिळू शकेल. पहिल्या सत्रात सॅलिसबरी विद्यापीठ यू. एस. ए. येथील अभ्यागत प्राध्यापक डॉ. प्रवीण सप्तर्षि यांनी शेतीविकासाची शाश्वतता या विषयावर मार्गदर्शन केले. तर दुस-या सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोल विभागप्रमुख डॉ. रवींद्र जायभाये यांनी ग्रामीण पर्यटनाचा शाश्वत विकास या विषयावार मार्गदर्शन केले.
या राष्ट्रीय वेबिनारला प्रमुख पाहुणे म्हणून आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष तुकाराम काळे, संस्थेचे कार्याध्यक्ष सुरेशशेठ काळे, संस्थेचे मानद सचिव अॅड. मुकुंद काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. संजय आर्विकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक व सल्लागार मंडळ उपस्थित होते. २६५ जणांनी प्रत्यक्ष या वेबिनारमध्ये सहभाग घेतला. या वेबिनारसाठी तांत्रिक सहायक म्हणून स्वप्निल डोके, पोपट माने, सचिन घायतडके, सागर दिवेकर यांनी काम पाहिले. प्रास्ताविक महाविद्यालयातील भूगोल विभागप्रमुख गुलाबराव पारखे यांनी केले. इतिहास विभागातील सहायक प्राध्यापक चांगुणा कदम यांनी सूत्रसंचालन केले. तर इतिहास विभागप्रमुख नाथा मोकाटे यांनी आभार मानले.