व्यावसायिक स्पर्धेतून त्याने केले संकेतस्थळ हॅक

By admin | Published: July 15, 2016 12:18 PM2016-07-15T12:18:22+5:302016-07-15T12:19:19+5:30

कॅन्सरसारख्या असाध्य रोगावर उपाय म्हणून वापरल्या जाणा-या व चांगले उत्पन्न देणा-या ड्रॅगन फुड या कलमाची नर्सरी करणा-याचे ग्राहक आपल्याकडे वळावे यासाठी एकाने नर्सरी व्यावसायिकाची वेबसाईट हॅक केली.

Website hacked from professional competition | व्यावसायिक स्पर्धेतून त्याने केले संकेतस्थळ हॅक

व्यावसायिक स्पर्धेतून त्याने केले संकेतस्थळ हॅक

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
 पुणे, दि. १५ -  कॅन्सरसारख्या असाध्य रोगावर उपाय म्हणून वापरल्या जाणा-या व चांगले उत्पन्न मिळवून देणा-या ड्रॅगन फुड या कलमाची नर्सरी करणा-याचे ग्राहक आपल्याकडे वळावेत, यासाठी नर्सरी व्यवसायिकाच्या संकेतस्थळ हॅक करुन त्यात बदल करणा-यास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील शांतीलाल नवलाखा ( रा़ औदुंबर सोसायटी, मार्केटयार्ड) असे त्याचे नाव आहे़ याप्रकरणी बाळकृष्ण धोंडिबा पानसरे (वय ३७, रा़ सदाशिव पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पानसरे यांची पानसरे नर्सरी या नावाची कंपनी आहे़ ही घटना ३ एप्रिल ते १६ जून २०१६ दरम्यान घडली.
याबाबतची हकीकत अशी, पानसरे यांची श्रीगोंदा येथे नर्सरी असून त्यांची जवळपास ३५० प्रॉडक्ट आहेत. कॅन्सरवर उपयुक्त समजल्या जाणा-या ड्रगन फळाच्या कलमाची विक्री पानसरे यांच्या नर्सरीमधून देशभर केली जाते. एप्रिल महिन्यात त्यांच्या संकेतस्थळावरील काही प्रॉडक्ट डिलिट झाली़ त्यांच्या संकेतस्थळावरील फोन नंबर, पत्ताही बदलला गेला़ सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले़ पण, काही दिवसांनी त्यांच्या ग्राहकांची लिस्ट तसेच अनेक प्रॉडक्ट संकेतस्थळावरुन डिलिट केली गेली. त्यामुळे त्यांच्याकडील ग्राहकांचा ओघही कमी झाल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली़ विश्रामबाग पोलीस आणि सायबर क्राईम सेलने त्याचा आयपी अ‍ॅडरेस शोधून त्यांनी स्वप्नील नवलाखा याला अटक केली.
 याबाबत पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांनी सांगितले की, सुमारे साडेतीन ते चार वर्षांपूर्वी सागर नवलाखा या नावाने पानसरे यांच्याकडून काही कलमे नवलाखा याने खरेदी केली होती. कोकणामध्ये १० एकर जागा घेऊन तेथे त्याने नर्सरी सुरु केल्याचे तो सांगतो़ सुरुवातीला पानसरे यांनी त्याला या फळाच्या कलमासाठी सर्व माहितीही दिली होती. स्वप्नील हा बीई इंजिरिअर असून त्याला संगणकाची चांगली माहिती आहे. पानसरे यांच्याकडील ग्राहके आपल्याकडे वळविण्यासाठी त्याने त्यांची वेबसाईट हॅक केली त्यांचा फोननंबर, पत्ता बदलला त्यामुळे पानसरे यांच्याशी संपर्क तुटला तर ते आपल्याला मिळतील, यासाठी त्याने हे प्रकार केला.न्यायालयाने अधिक तपास करण्यासाठी स्वप्नील नवलाखा याला १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. 
 

Web Title: Website hacked from professional competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.