आराेग्य विभागाचे संकेतस्थळ ‘काेमात’ अर्ज भरताना तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी हैराण

By प्रशांत बिडवे | Published: September 18, 2023 09:58 PM2023-09-18T21:58:40+5:302023-09-18T21:58:51+5:30

आराेग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील १० हजार ९४९ जागांवर पदभरती सुरू आहे.

Website of Health Department 'Komat' | आराेग्य विभागाचे संकेतस्थळ ‘काेमात’ अर्ज भरताना तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी हैराण

आराेग्य विभागाचे संकेतस्थळ ‘काेमात’ अर्ज भरताना तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी हैराण

googlenewsNext

पुणे : आराेग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील १० हजार ९४९ जागांवर पदभरती सुरू आहे. त्यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्याचा साेमवारी दि. १८ पर्यंत अंतिम मुदत दिली हाेती. अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने आराेग्य विभागाचे सर्व्हर डाउन झाले अन असंख्य उमेदवारांना मुदतीत अर्ज दाखल करण्यासाठी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

सार्वजनिक आराेग्य विभागाच्या संकेतस्थळावर दि. २९ ऑगस्ट राेजी दुपारी तीन वाजता ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली. तसेच १८ सप्टेंबर राेजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत मुदत देण्यात आली हाेती. मात्र, अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने संकेतस्थळावर ताण आला आणि अर्ज भरण्यास अनेकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. अर्ज भरताना फाेटाे, प्रमाणपत्र अपलाेड करणे तसेच शुल्क जमा करताना वारंवार संकेतस्थळ बंद पडत हाेते त्यामुळे पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी

ऑनलाईन अर्ज भरताना संकेतस्थळ बंद पडत असल्याबाबत आराेग्य मंत्र्यांच्या स्वीय सहायकांकडे तक्रार केली. तसेच मुदत वाढवून मिळावी यासंदर्भात विनंती केली आहे.

- महेश घरबुडे कार्याध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर शुल्क जमा केले. माझ्या बॅंक खात्यातून पैसे कपात झाल्याचा मेसेज प्राप्त झाला मात्र, पेमेंट स्टेटस फेल दाखवत आहे. दिवसभरात अनेकदा साईट एरर दिसत हाेती. गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक नेट कॅफे बंद असल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.
- सचिन मतकर, उमेदवार

अर्ज अर्धवट भरलेला असतानाच संकेतस्थळ अचानक बंद पडत हाेते. मी तीन ते चार वेळा अर्ज भरला मात्र, प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात अपलाेड केले मात्र, नेमके शुल्क जमा करताना संकेतस्थळ बंद पडत हाेते.
- भक्तराम फड, उमेदवार

Web Title: Website of Health Department 'Komat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.