काेराेनाचा सामना करण्यासाठी आता वेबसाईट ; काेराेनाची लक्षणे आढळल्यास देता येणार माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 09:29 PM2020-03-15T21:29:14+5:302020-03-15T21:30:24+5:30
काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी वेबसाईट कार्यान्वित करण्यात आली असून परदेशातून आलेले नागरिक आपल्या तब्येतीची माहिती या वेबसाईटवर प्रशासनाला देऊ शकतात.
पुणे : काेराेनाचा प्रादुर्भाव सध्या राज्यात वाढताना दिसत आहे. राज्यात काेराेनाबाधितांची संख्या 33 वर जाऊन पाेहचली आहे. पुण्यात आणखी एका नागरिकाला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले असून आता पुण्यातील काेराेनाबाधितांची संख्या 11 झाली आहे. परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता जिल्हापरिषदेकडून वेबसाईट सुरु करण्यात आली असून ज्या मार्फत परदेशातून आलेल्या नागरिकांना सेल्फ काॅरनटाईन करता येणार असून स्थानिक डाॅक्टरांना देखील काेराेनाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णाची माहिती प्रशासनाला देता येणार आहे.
काेराेनाचा वाढता प्रभाव राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययाेजना करण्यात येत आहेत. 1 मार्च नंतर परदेशातून आलेल्या नागरिकांचा शाेध घेण्यात येत असून त्यांना काेराेनाची लक्षणे आहेत का याची तपासणी करण्यात येत आहे. काेराेनाचा प्रसार वाढू नये यासाठी परदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून जिल्हा प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आता पुणे जिल्हापरिषदेकडून एक वेबसाईट सुरु करण्यात आली असून त्यात विदेशातून आलेल्या नागरिकांना तसेच काेराेना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना आपल्या प्रकृतीची माहिती भरता येणार आहे. त्यावर जिल्हा प्रशासनाकडून त्या नागरिकांना विविध सुचना व घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
त्याचबराेबर स्थानिक डाॅक्टरांना देखील काेराेनाची लक्षणे असलेल्या रुग्णाबाबतची माहिती या वेबसाईटद्वारे प्रशासनाला देता येणार आहे. idsp.mkcl.org या वेबसाईटवर जाऊन ही माहिती भरता येणार आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही वेबसाईट कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, ही वेबसाईट पुणे जिल्ह्यासाठी तयार करण्यात आली आहे. यात दाेन विभाग असून एका विभागामध्ये स्थानिक डाॅक्टरांना परदेशातून आलेला रुग्ण हा काेराेनाबाधित हाेऊ शकताे किंवा काेराेना बाधित रुग्णाच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली आहे. त्याची माहिती या वेबसाईटवर देता येऊ शकते. तसेच विदेशात जाऊन आलेली व्यक्ती किंवा ज्यांना काेराेनाची लक्षणे आढळत आहेत अशी व्यक्ती स्वतः यात माहिती भरु शकते. ते स्वतःला सेल्फ काॅरनटाईन करु शकतात. या वेबसाईटच्या माध्यमातून दरराेज त्या व्यक्तीच्या तब्येतेची आढावा घेण्यात येताे.