लग्नाचा खर्च परवडेल; घटस्फोटाचा नाही

By admin | Published: December 20, 2014 11:52 PM2014-12-20T23:52:15+5:302014-12-20T23:52:15+5:30

‘प्रत्येक घरात कोणती ना कोणती समस्या असते. मात्र, न्यायालयात गेले तर आपला प्रश्न सार्वजनिक होईल, गुप्तता संपेल यामुळे अनेक जण कौटुंबिक न्यायालयाला जाणे टाळतात.

Wedding expenses will be expensive; Not a divorce | लग्नाचा खर्च परवडेल; घटस्फोटाचा नाही

लग्नाचा खर्च परवडेल; घटस्फोटाचा नाही

Next

पुणे : ‘प्रत्येक घरात कोणती ना कोणती समस्या असते. मात्र, न्यायालयात गेले तर आपला प्रश्न सार्वजनिक होईल, गुप्तता संपेल यामुळे अनेक जण कौटुंबिक न्यायालयाला जाणे टाळतात. त्यातच आजच्या काळात लग्नाचा खर्च परवडेल; पण घटस्फोटाचा नाही. शिवाय, कौटुंबिक न्यायालयांवरील खटल्याचा भार यामुळे घटस्फोटासाठी लांबणारा वेळ अन् खर्च दोन्ही न भरून येणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळेच नातेसंबंधांना समुपदेशनाने सांधण्याची हळुवार प्रक्रिया करणारी पर्यायी व्यवस्था होणे ही काळाची गरज आहे,’ असे वक्तव्य न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. मुकुंद सारडा यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, न्यू लॉ कॉलेजच्या कौटुंबिक कायदेविषयक मोफत सल्ला केंद्राच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सारडा बोलत होते. या वेळी समुपदेशक स्मिता जोशी, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ज्योती शिंदे, अ‍ॅड. राजेंद्र अनभुले, केंद्राच्या समन्वयिका डॉ. सपना देव, वकील कार्यकर्ते उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त सरणाऱ्या वर्षात केंद्राद्वारे मिटविण्यात आलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये विवाहपूर्व समुपदेशनापासून लिव्ह इन रिलेशनशिप या वादापर्यंत ४१५ प्रकरणे मिटविण्यात आली. यामध्ये सर्वाधिक वैवाहिक मतभेद असलेले १६५ खटले, तर नातेसंबंधांतील ताणतणावांची १२२ प्रकरणे मिटविण्यात आली.
या वेळी डॉ. सारडा म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांमध्ये कौटुंबिक वाद हे मिटविण्यासाठी असतात, याचे भान जागे होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान तयार करणे हे मुख्य उद्देश पाळले जातात.’’ डॉ. शिंदे म्हणाल्या, ‘‘समुपदेशनाचा उपयोगही संबंधित पक्षकाराला चूक मान्य झाल्यानंतरच होतो. यासाठी त्यांना मानसोपचाराची अत्यंत गरज असते. मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे हे आजही लाजिरवाणे मानले जाते; पण आपले कुटुंब वाचविण्यासाठी त्याची गरज आहे आणि सकारात्मक परिणाम दिसला, की पक्षकार ही योग्यरीत्या दखल घेऊ लागतात. तुटलेल्या नात्यांचा मुलांवरही वाईट परिणाम होत असतो. ते स्वत:ही मग विभंगलेलीच कुटुंबव्यवस्था निर्माण करतात. हे थांबविण्यासाठी पहिल्याच कुटुंबात प्रयत्न होणे आवश्यक आहे. या वेळी इतर वकील व पक्षकारांनीही अनुभवकथन केले. डॉ. सपना देव यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)

४विवाहपूर्व समुपदेशन : २९
४वैवाहिक मतभेद : १६५
४पुनर्विवाह समस्या : १०
४एकेरी पालकत्व : १०
४मुलांच्या समस्या : २५

४लिव्ह इन रिलेशनशिप : १०
४घटस्फोटानंतरच्या समस्या : १८
४ज्येष्ठ नागरिक समस्या : १०
४नातेसंबंधांतील समस्या १२२
४इतर कौटुंबिक समस्या व
वारसा हक्क : १६

 

Web Title: Wedding expenses will be expensive; Not a divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.