बुधवारी १७० कोरोनाबाधित : १९२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:12 AM2021-09-23T04:12:35+5:302021-09-23T04:12:35+5:30
पुणे : शहरात बुधवारी १७० कोरोनाबाधित आढळून आले असून, १९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ८ ...
पुणे : शहरात बुधवारी १७० कोरोनाबाधित आढळून आले असून, १९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ४५८ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २ टक्के इतकी आढळून आली आहे. आज शहरातील कोरोना तपासणीची संख्या ३३ लाखांच्या पुढे गेली असून, आजपर्यंत शहरात ३३ लाख ६ हजार २१२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या आजमितीला १ हजार ५९६ सक्रिय रुग्ण आहेत. तर, दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही १७८ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २६३ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ४ लाख ९९ हजार ७८८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, यापैकी ४ लाख ८९ हजार २०६ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
----------------
पुण्यातील कोरोनास्थिती :
बुधवारी बाधित : १७०
घरी सोडले : १९२
एकूण बाधित रुग्ण : ४,९९,७८८
सक्रिय रुग्ण : १,५९६
आजचे मृत्यू : ०६
एकूण मृत्यू : ९००९