बुधवारी २५७ कोरोनाबाधित : २४२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:14 AM2021-09-09T04:14:50+5:302021-09-09T04:14:50+5:30
पुणे : शहरात बुधवारी २५७ कोरोनाबाधित आढळून आले असून, २४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ...
पुणे : शहरात बुधवारी २५७ कोरोनाबाधित आढळून आले असून, २४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर १० हजार ६९८ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.४० टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार १५२ इतकी आहे. आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २१२ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९० इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३२ लाख ३ हजार २६३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९७ हजार ४१२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८६ हजार २९८ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९६२ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील कोरोनास्थिती :
बुधवारी बाधित : २५७
घरी सोडले : २४२
बाधित रुग्ण : ४,९७,४१२
सक्रिय रुग्ण : २,१५२
मृत्यू : ०९
एकूण मृत्यू : ८,९६२