बुधवारी २८३ कोरोनाबाधित : २५५ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:42+5:302021-06-24T04:09:42+5:30

पुणे : शहरात बुधवारी २८३ कोरोनाबाधित आढळून आले असून २५५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत शहरात २ हजार ३७५ ...

Wednesday 283 corona free: 255 corona free | बुधवारी २८३ कोरोनाबाधित : २५५ कोरोनामुक्त

बुधवारी २८३ कोरोनाबाधित : २५५ कोरोनामुक्त

Next

पुणे : शहरात बुधवारी २८३ कोरोनाबाधित आढळून आले असून २५५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत शहरात २ हजार ३७५ सक्रिय रुग्ण आहेत. आज नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रथमच कमी आढळून आले आहे. गेल्या तीन महिन्यात असे प्रथमच घडले असून सातत्याने कमी होणारी सक्रिय रुग्ण संख्याही कालच्या तुलनेत २१ने वाढली आहे.

आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ४३७ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५़२० टक्के इतकी आहे. आज १६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ९ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही ३३१ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४६४ इतकी आहे. शहरात आतापर्यंत २६ लाख २९ हजार ९९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७६ हजार ४९३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६५ हजार ५६९ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

--------

पुण्यातील कोरोनास्थिती

आज बाधित रुग्ण - २८३

आज घरी सोडले - २५५

एकूण बाधित रुग्ण - ४,७६,४९३

सक्रिय रुग्ण - २, ३७५

आजचे मृत्यू - १६

एकूण मृत्यू - ८,५४९

Web Title: Wednesday 283 corona free: 255 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.