बुधवारी ३११ कोरोनाबाधित : ४५६ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:09+5:302021-06-10T04:08:09+5:30
पुणे : शहरात बुधवारी ३११ कोरोनाबाधित आढळून आले असून, ४५६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ सद्यस्थितीला शहरातील सक्रिय कोरोनाबाधित ...
पुणे : शहरात बुधवारी ३११ कोरोनाबाधित आढळून आले असून, ४५६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ सद्यस्थितीला शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजार ५३९ इतकी आहे़
आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ७५८ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ४.६० टक्के इतकी आहे़ तर आज २३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ८ जण हे पुण्याबाहेरील असून, शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७८ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या १ हजार ४९ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही ५६३ इतकी आहे. शहरात आतापर्यंत २५ लाख ५५ हजार ५८३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७३ हजार ३९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ४ लाख ६१ हजार ६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आतापर्यंत ८ हजार ४३७ जणांचा मृत्यू झाला आहे़
-----------
पुण्यातील कोरोनास्थिती
आज बाधित रुग्ण - ३११
आज घरी सोडले - ४५६
एकूण बाधित रुग्ण - ४,७३,०३९
सक्रिय रुग्ण - ३,५३९
आजचे मृत्यू - २३
एकूण मृत्यू - ८,४३७