बुधवारी कोरोनाबाधित १९९ : २२५ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:15 AM2021-09-16T04:15:54+5:302021-09-16T04:15:54+5:30
पुणे : शहरात बुधवारी १९९ कोरोनाबाधित आढळून आले असून, २२५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी विविध तपासणी केंद्रांवर ७ ...
पुणे : शहरात बुधवारी १९९ कोरोनाबाधित आढळून आले असून, २२५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ९७३ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.४९ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या आजमितीला १ हजार ८५८ सक्रिय रुग्ण आहेत, तर दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पाचजण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्युदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही १८८ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २२५ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३२ लाख ५२ हजार ७१७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९८ हजार ६६७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर यापैकी ४ लाख ८७ हजार ८२३ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९८६ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील कोरोनास्थिती :
बुधवारी बाधित : १९९
घरी सोडले : २२५
एकूण बाधित रुग्ण : ४,९८,६६७
सक्रिय रुग्ण : १,८५८
आजचे मृत्यू : ०८
एकूण मृत्यू : ८,९८६