ग्रामीण भागातील संचारबंदीबाबत बुधवारी निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:09 AM2020-12-23T04:09:51+5:302020-12-23T04:09:51+5:30
पुणे : ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार पुणे शहरामध्ये मंगळवार (दि.२२) पासून रात्री संचारबंदी ...
पुणे : ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार पुणे शहरामध्ये मंगळवार (दि.२२) पासून रात्री संचारबंदी लागू केली आहे. परंतू जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संचारबंदी लागू करायची की नाही, याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे बुधवारी (दि. २३) घेेणार आहेेत.
ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार केलेल्या कृती दलाच्या अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी होणार आहे. या बैठकीमध्ये करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदीबाबत निर्णय घेणार आहे.
ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारी म्हणून राज्यातील महापालिकांच्या क्षेत्रात मंगळवारपासून (दि. २२) रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या संचारबंदीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले, सध्या
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्रीची संचारबंदी नाही. ग्रामीण भागातील करोना कृती दलाच्या अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील करोनास्थितीचा आढावा घेऊन रात्रीच्या संचारबंदीबाबत निर्णय घेणार आहे.