आठवडे बाजार नीरा पोलिसांनी भरू दिला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:21+5:302021-06-24T04:09:21+5:30
पुरंदर तालुक्यातील सर्वांत मोठी बाजरपेठ असलेल्या नीरा येथील आठवडेबाजार बुधवारी असतो. मागील बुधवारी बाजारतळावर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकवत बाजकर ठेकेदाराने ...
पुरंदर तालुक्यातील सर्वांत मोठी बाजरपेठ असलेल्या नीरा येथील आठवडेबाजार बुधवारी असतो. मागील बुधवारी बाजारतळावर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकवत बाजकर ठेकेदाराने बाजर भरवला होता. दि. २३ रोजी सकाळपासूनच पोलिसांनी व्यापाऱ्यांना बाजारात बसू दिले नाही. मात्र, बारामती रोडवरील बुवासाहेब मंदिरा शेजारी दिवसभर व्यावसायिकांनी भाजीविक्री केली. दुपारी चारनंतर या बाजारात मोठी गर्दी होती. व्यावसायिकांसह बाजारकरूंनीही सोशल न्चा फज्जा उडवला होता व सर्रास कोणीसी मास्क लावला नव्हता.
नीरेच्या आठवडे बाजारात बुधवारी शुकशुकाट होता. पण नीरा-बारामती रोडवरील बुवासाहेब मंदिराशेजारील पटांगणात मोठ्यासंख्येन भाजी विक्रेत्यांनी गर्दी करत दिवसभर भाजीपाला चढ्या दराने विक्री केला. निर्धारित वेळ दुपारी चारची असतानाही हे सायंकाळी पाचपर्यंत दुकान थाटून बसले होते. नीरा पोलिसांनी धडक कारवाई करत सायंकाळी साडेपाच वाजता या व्यापाऱ्यांकडून दंड वसूल केला. या कारवाईत नीरा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, फौजदार सुरेश गायकवाड, हवालदार राजेंद्र भापकर, संदीप मोकाशी, नीलेश जाधव, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, होमगार्ड व पोलीस मित्रांनी कारवाईत सहभाग घेतला होता.
नीरा येथील बाजारपेठेतील दुकाने नियोजित वेळ टळल्यानंतरही सुरू ठेवणाऱ्या दुकानांवर कारवाई करताना पोलीस.
नीरा आठवडे बाजार बंद ठेवल्यानंतरही बारामती रोडवरील बुवासाहेब मंदिराशेजारील भाजीमंडई सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू ठेवल्याने दंडात्मक कारवाई करताना पोलीस.