रस्त्यावर भरणारा आठवडे बाजार थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:23 AM2018-08-26T00:23:25+5:302018-08-26T00:23:41+5:30
बारामती : नगर परिषदेने कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली गणेश मंडई अखेर गजबजली
बारामती : बारामती नगर परिषदेने कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधलेली श्री गणेश भाजी मंडई अखेर गजबजली आहे. बसस्थानक परिसरातील रस्त्यांवर भरणारा आठवडे बाजार नगरपालिका प्रशासनाच्या निर्णयामुळे अखेर नव्या भाजी मंडईत सुरु झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर होणारी कोंंंडी पूर्णपणे थांबली आहे. नगरपालिका प्रशासनाच्या निर्णयाचे श्री गणेश भाजी मंडई विक्रेता संघटनेने स्वागत केले आहे. परिणामी वाहतूकोंडीचेप्रमाण वाढीस लागले होते.
रस्त्यावर शेतकरी, फळविक्रेते, खाद्य पदारताचे स्टॉल, यांनी दर गुरुवारी दुकाने थाटल्याने इथे असणाऱ्या हॉस्पिटल, तसेच रहादरीला व इथून रिंगरोडने बाहेर जाणाºया वाहनचालकांची कसरत होत असे. शिवाय एसटी शहरातून स्टँडकडे जाताना मुख्य रस्त्यावर देखील वाहतुकीचा खोळंबा होत असे.मात्र, आता या रस्त्याने पुन्हा मोकळा श्वास घेतला आहे. यापार्श्वभूमीवर आरोग्य निरीक्षक मंडई विभाग प्रमुख सुभाष नारखेडे, आरोग्य निरीक्षक अतिक्रमण विभाग प्रमुख राजेंद्र सोनवणे, दादा जोगदंड, राजेंद्र सुपेकर यांच्यासह पथकाने रस्त्यावर भाजीविक्रीसाठी बसणारे व्यापारी, शेतकरी यांच्याशी चर्चा करुन रस्त्यावर दुकाने न लावू देण्याचा इशारा दिला. मंडईच्या आवारात भाजीविक्रीसाठी जागा प्रत्येकाला उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रस्त्यावरील बाजार मोडून व्यावसायिकांनी मंडईमध्ये जाऊन भाजीविक्री केली.
व्यावसायिकांनाही मिळाला समाधानकारक व्यवसाय
श्री गणेश भाजी मंडई भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष चिऊशेठ जंजिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, नगरपालिका प्रशासनाने घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे मंडईची नवीन इमारत गजबजली आहे. प्रत्येक व्यावसायिकाचा व्यवसाय चांगला झाला. सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. व्यवसाय चांगला झाल्याने प्रत्येकाने समाधान व्यक्त केले आहे. प्रत्येकाला जागा उपलब्ध करुन दिली आहे. प्रत्येकाचा व्यवसाय चांगला झाला. सायंकाळी ५ च्या दरम्यान अनेकांची विक्री संपली. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केल्याचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले.
हप्तावसुली अखेर थांबली.
येथे लागणाºया प्रत्येक दुकानदारांकडून नगरपालिका २० रुपयांची पावती देते. त्याचप्रमाणे या शेतकºयांकडून काही गुंड प्रवृत्तीचे लोक हप्तावसुली करीत असत. आता रस्त्यावर मंडई भरणार नसल्याने हप्तावसुली थांबली आहे. काही जण फुकटची पिशव्या भरून मंडई नेत असत. मात्र, आता या फु कट्यांना चाप बसला आहे.
एसटी बसस्थानकापासून मागे जाणाºया रस्त्यावरच आठवडे बाजारा दिवशी शेतकरी, व्यापारी भाजी विक्रीची दुकाने लावून बसत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होत असे. तर दुसरीकडे कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधलेली श्री गणेश भाजी मंडईची इमारत ओस पडत असे. मंडईतील व्यावसायिकांना विक्रीसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसे. गुरुवारी आणलेला भाजीपाला दोन दिवस विकावा लागत असे. त्यामुळे रस्त्यावर बसणाºया भाजीविक्रेत्यांमध्ये वाढच होत होती. त्यामुळे इंदापुर मार्गावर देखील भाजीविक्री सुरु झाल्याचे चित्र होते.