आठवडे बाजारातील लिलावाची रक्कम घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:10 AM2018-12-21T01:10:56+5:302018-12-21T01:11:11+5:30

पाच लाखांची घट : वीस लाख शंभर रुपयांवर लिलाव उरकला

Weekly the auctioneer of the market dropped | आठवडे बाजारातील लिलावाची रक्कम घसरली

आठवडे बाजारातील लिलावाची रक्कम घसरली

Next

यवत : यवत येथील आठवडे बाजार कराचा लिलाव २० लाख १०० रुपयांना गेला असून, यंदा प्रथमच बाजार लिलावाची रक्कम कमी झाली आहे. मागील वर्षी सदर लिलाव २५ लाख १०० रुपयांना घेतला गेला होता. १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान होणाऱ्या आठवडे बाजार कराचा लिलाव आज ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आला.या लिलावाद्वारे आठवडे बाजार मधील दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांच्याकडून कर वसुलीचा ठेका दिला जातो. यवत मधील आठवडे बाजार दौंड तालुक्यातील मोठ्या बाजारांपैकी एक आहे. दर वर्षी येथील बाजार लिलाव जास्तीच्या दराने जातो मात्र यंदा मागील वर्षी पेक्षा पाच लाख रुपयांनी कमी गेला आहे. यामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी होणार आहे.

यंदा लिलावात पाच व्यक्तींनी सहभाग घेतला यात रमेश शामराव दोरगे, रमेश लखमीचंद जैन, संतोष भीमराव दोरगे, निलेश बबनराव शेंडगे, विकास दिलीप दोरगे यांनी सहभाग घेतला. यात रमेश जैन यांनी २० लाख १०० रुपयांना सर्वाधिक बोली लावत लिलाव घेतला.यावेळी सरपंच राजिया तांबोळी, उपसरपंच भाऊसो दोरगे, माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, माजी उपसरपंच सुभाष यादव, सदानंद दोरगे, ग्रामपंचायत सदस्या लता देवकर, किशोर शिंदे उपस्थित होते.

मुख्य रस्त्यांवर दुकाने लावू न देण्याची जबाबदारी लिलाव घेणाºयांची

पुणे सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर व यवत खुटबाव रस्त्यावर दुकाने लावली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.
याबाबत वारंवार कारवाई करून देखील देखील परिणाम होत नव्हता. आता बाजार लिलाव करताना ग्रामपंचायतीने विशेष अट घालून सेवा रस्त्यावर व इतर रस्त्यावर दुकाने लागल्यास त्यांच्याकडून वसुली न करता याउलट संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Web Title: Weekly the auctioneer of the market dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे