आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट दहाच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:08 AM2020-12-07T04:08:29+5:302020-12-07T04:08:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात होणाऱ्या चाचण्यांच्या तुलनेत नव्याने आढळून येणारे कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण मागील आठवड्यात दहा टक्क्यांच्या ...

Weekly positivity rate below ten | आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट दहाच्या खाली

आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट दहाच्या खाली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात होणाऱ्या चाचण्यांच्या तुलनेत नव्याने आढळून येणारे कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण मागील आठवड्यात दहा टक्क्यांच्या खाली आले आहे. कोरोना कहरानंतर पहिल्यांदाच आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट एवढा कमी झाला आहे. तसेच या आठवड्यातील मृत्यूदरही मागील काही आवठवड्यांच्या तुलनेत कमी झाला आहे. हे प्रमाण १.२६ टक्के एवढे होते.

ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. आठवडानिहाय आकडेवारीचा आढावा घेतल्यास असे निदर्शनास येते की, २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधी २० हजार ३१४ चाचण्या झाल्या आहे. त्यामध्ये सुमारे २ हजार रुग्ण आढळून आले. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट ९.७१ पर्यंत खाली आला. तसेच या कालावधीत २५ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर १.२६ टक्के राहिला. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्यानंतर मागील काही महिन्यांत पहिल्यांदाच एका आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या खाली आला आहे. तसेच मृत्यूदरही कमी झाल्याचे दिसून येते. महिनाभरापुर्वी पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांंहून किंचित अधिक होता. पण त्यावेळी चाचण्यांचे प्रमाण ७ हजाराने कमी होते. तर त्या आठवड्यातील मृत्युदर ६.४६ एवढा नोंदविला गेला होता.

दरम्यान, दिवाळीनंतर वाढलेल्या चाचण्यांमध्ये मागील आठवडाभरात काही प्रमाणात घट झाली आहे. दि. २२ ते २८ नोव्हेंबरदरम्यान २२ हजार ८६१ चाचण्या झाल्या होत्या. मागील आठवड्यात यामध्ये सुमारे अडीच हजारांनी घट झाली. सध्या दररोज सरासरी २ हजार ९०० चाचण्या होत असून २८२ रुग्ण आढळून येत आहेत. तर ३ ते ४ जणांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले.

---

मागील काही आठवड्यांतील स्थिती

कालावधी चाचण्या रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट मृत्यू दर

२९ नोव्हें. ते ५ डिसें. २०,३१४ १९७५ ९.७१ १.२६

२२ ते २८ नोव्हें. २२,८६१ २४१२ १०.५५ १.३२

१५ ते २१ नोव्हें. १६,८२६ १९१० ११.३४ १.८८

८ ते १४ नोव्हें. १२,५३४ १३१५ १०.४९ ३.२६

१ ते ७ नोव्हें. १३,४१६ १३४६ १०.०३ ६.४६

Web Title: Weekly positivity rate below ten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.