वेल्हे, हिडरेशी फिडरवर 8 तासांचे भारनियमन

By admin | Published: December 9, 2014 11:30 PM2014-12-09T23:30:42+5:302014-12-09T23:30:42+5:30

तालुक्यात शेती पंप असणा:या वेल्हे व हिडरेशी या दोन फीडरवर दररोज 8 तासांचे भारनियमन सुरू असल्याने त्याचा पिकांवर परिणाम होत आहे.

Weight loss for 8 hours on wetherd, feeder feeder | वेल्हे, हिडरेशी फिडरवर 8 तासांचे भारनियमन

वेल्हे, हिडरेशी फिडरवर 8 तासांचे भारनियमन

Next
भोर : तालुक्यात शेती पंप असणा:या वेल्हे व हिडरेशी या दोन फीडरवर दररोज 8 तासांचे भारनियमन सुरू असल्याने त्याचा पिकांवर परिणाम होत आहे. वीजबिलातही 2क् टक्के  वाढ होणार असल्याने भोर तालुक्यातील शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. 
भोर तालुक्यातील वेल्हे फीडरवरील शेती पंप असणा:या  भोंगवली विभागासह महामार्गाच्या आसपासच्या गावातील व हिडरेशी फीडरवरील आंबवडे, वीसगाव खोरे व शेती पंप असणा:या गावात थ्री फेज लाईनवर सुमारे 8 तासांचे भारनियमन दररोज सुरू आहे. यामुळे बागायती पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. अनेकदा वीज नसल्याने रात्रीअपरात्री पिकांना पाणी देण्यास जावे लागते. पाण्याआभावी पिकांच्या उत्पादनावरही परिणाम होत असल्याचे भोंगवली येथील शेतकरी दिलीप निगडे यांनी सांगितले.
सिंगल फेज लाईनवर (घरगुती वापराच्या) भारनियमन केले जात नाही. मात्र, सिंगल फेजमुळे काहीच काम होत नाही. त्यामुळे त्या लाईनचा घरगुती वीजवापर वगळता फारसा उपयोग होत नाही. (वार्ताहर)
 
4विधानसभा निवडणुकीपूर्वी वीजबिलात शासनाने 2क् टक्के म्हणजे प्रतियुनिट 3.36 रुपयांवरून 4.16 रुपये वाढ केली होती. मात्र, निवडणुका तोंडावर असल्याने शेतकरी नाराज होऊन त्याचा परिणाम निवडणुकीवर होईल. यामुळे शासनाने सदरची वीजबिलाची वाढ कमी करून प्रतियुनिट 3.36 रुपये कायम ठेवली होती. निवडणुकांनंतर आता ठरलेली 2क् टक्के वाढ नवीन शासनाने कायम केली आहे. सदरची वाढ ही सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी नाही.
4शासनाने विधानसभा निवडणुकीपुरताच लोकांना वीजदर वाढ कमी करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आणि आता त्यात वाढ केली. एक तर कधीच नियमित वीज उपलब्ध नाही. वारवार पुरवठा खंडित होतो. अनेकदा अॅव्हरेज बिले दिली जातात. प्रत्यक्षात घरी जाऊन रीडिंग घेतले जात नाही. त्यात वाढ म्हणजे शेतक:यांच्या मानेवर सुरी ठेवल्यासारखे आहे. 
 
मीटर न बसवताच सहा महिन्याचे बिल
भोर : मीटरसाठी कोटेशन भरून वर्ष झाले. मात्र, मीटर न बसवताच वीजग्राहकाला गेल्या सहा महिन्यांपासून वीजबिल येत आहे. डिसेंबर महिन्यात 163क् रु वीजबिल कंपनीने दिले आहे. सदरचे बिल कोणाच्या मीटरचे रीडिंग लावून दिले, कंपनीलाच माहीत नाही. ग्राहक मात्र सहा महिन्यांपासून भोर व किकवीच्या कार्यालयात  हेलपाटे मारीत आहे. 
याबाबत शेखर शेटे यांनी सांगितले, की मी एक वर्षापूर्वी भोंगवली येथील घरगुती मीटर घेण्यास वडिलांच्या नावावर कोटेशन व पैसे भरले आहेत. मात्र, मीटर बसवला नाही. असे असताना बिल येत आहे.  याची किकवी कार्यालयात चौकशी केली असता,  तुमचा मीटर दिला आहे, असे सांगितले जाते. तर, भोरच्या कार्यालयात गेल्यास किकवीला जाण्यास सांगितले जाते. ही ससेहोलपट गेल्या वर्षापासून सुरू आहे. आमचा मीटर नक्की कोणाला दिला आणि आम्हाला कोणाच्या मीटरचे रीडिंग दिले जाते, याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी शेटे यांनी केली.
 
महावितरणचा अजब प्रकार
4भोंगवली (ता. भोर) येथील रामचंद्र तुकाराम शेटे यांच्या बाबत हा प्रकार घडला आहे. त्यांना 2क्क्1824273 या मीटर क्रमांकावर मागील रीडिंग 125 युनिट व चालू रीडिंग 125 युनिट एकूण वीजवापर शून्य युनिट. याचे  4 डिसेंबर ला 163क् रु वीजबिल आले आहे. 
4रामचंद्र तुकाराम शेटे यांच्या नावावर वीजबिल आले आहे. मात्र, काटेशनचे पैसे भरूनही प्रत्यक्ष मीटर बसवलाच नाही. मग वीजबिल कोणाच्या रीडिंगचे दिले. कंपनीकडून मीटर दिल्याचे सांगितले जाते. कंपनीच्या अजब कारभारामुळे ग्राहक हेलपाटे मारून त्रस्त झाला असून, विहीर चारीला गेली यासारखी अवस्था झाली आहे. 

 

Web Title: Weight loss for 8 hours on wetherd, feeder feeder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.