चौपदरीकरणालाही पेलेना वाहतुकीचा भार
By admin | Published: December 29, 2014 12:45 AM2014-12-29T00:45:37+5:302014-12-29T00:45:37+5:30
राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती असलेल्या पुणे-नाशिक महामार्गावर जलद वाहतुकीसाठी चौपदरीकरण होऊनही या रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होताना दिसत नाही.
निनाद देशमुख, पुणे
राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती असलेल्या पुणे-नाशिक महामार्गावर जलद वाहतुकीसाठी चौपदरीकरण होऊनही या रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होताना दिसत नाही. हे चौपदरीकरणही खेड टोलनाक्यापर्यंतच झाले आहे. पुढील काम रखडलेले आहे. अर्धवट कामे, अवजड वाहतूक, नियमांची पायमल्ली, सिग्नलचा अभाव आणि प्रशासकीय उदासीनता यामुळे पुणे ते आळेफाटा दरम्यानचे अंतर तब्बल १ तासाने वाढल्याचे ‘लोकमत’ पाहणीत आढळून आले.
राज्यातील प्रमुख औद्योगिक वसाहती पुणे-नाशिक महामार्गाने जोडल्या आहेत. यामुळे या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ असते. जलद वाहतुकीसाठी खेडपर्यंत चौपदरीकरण करण्यात आले. मात्र, वाहतुकीचा भार वाढलेलाच दिसतो. याचा त्रास हजारोंच्या संख्येने जाणाऱ्या प्रवाशांना दिसतो.
सकाळी १०.२० ला शिवाजीनगर बसस्थानकाहून आळेफाट्याला जाण्यासाठी प्रवास सुरू केला. आळेफाटा-पुणे हे जवळ ९० कि.मी. अंतर पार करण्यासाठी दोन तास लागतात. मात्र, अवजड वाहतूक, बेशिस्त वाहनचालक, रस्त्यावर झालेले अतिक्रमणे, यामुळे हे अंतर तासाने वाढले. आळेफाट्याला जायला साडेतीन तास लागले. भोसरी, चाकण आणि आंबेठाण येथील औद्योगिक वसाहतील कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेहमीच या रस्त्यावर दर १५ किलोमीटर अंतरावर होणाऱ्या कोंडीमुळे कामावर वेळेवर पोहचता येत नाही. पुणे ते चाकण हे अंतर ३५ कि.मी. आहे. हे अंतर पार करण्यासाठी ४५ मिनिटे अपेक्षित असताना १ तास लागला.
महामार्गादरम्यान दुभाजकांमध्ये मोकळी जागा सोडल्याचे
आढळले. यातून मधेच दुचाकी तसेच चारचाकी वाहने बेशिस्तपणे मार्ग ओलांडत असल्याने वेगाने येणाऱ्या वाहनांचा वेग मंदावतो आणि वाहतूककोंडी होते.