परतीच्या प्रवासातील संत तुकोबारायांच्या पालखीचे इंदापुरात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:10 AM2021-07-25T04:10:46+5:302021-07-25T04:10:46+5:30

------------- इंदापूर : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा क्षेत्र पंढरी येथून काल्याच्या कीर्तनाने पालखी सोहळ्याची सांगता करून क्षेत्र ...

Welcome to Indapur in the palanquin of Saint Tukobaraya on his return journey | परतीच्या प्रवासातील संत तुकोबारायांच्या पालखीचे इंदापुरात स्वागत

परतीच्या प्रवासातील संत तुकोबारायांच्या पालखीचे इंदापुरात स्वागत

Next

-------------

इंदापूर : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा क्षेत्र पंढरी येथून काल्याच्या कीर्तनाने पालखी सोहळ्याची सांगता करून क्षेत्र देहूकडे परतीच्या मार्गावर जाताना, फक्त इंदापूर शहरात रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात एका तासाच्या विसाव्यासाठी हरिनामाचा गजर करीत थांबला. नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा यांच्या हस्ते विधिवत पूजा करत इंदापूरकरांनी पालखी सोहळ्याचे उत्स्फूर्त स्वागत केले.

संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा व इंदापूरकर असा वेगळा जिव्हाळा अनेक वर्षांपासून चालत आला आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिक भक्तगण पालखी सोहळ्याच्या आगमनाची परतीची जय्यत मनोभावे तयारी करत असतात. मात्र देशभरात पसरल्यामुळे हजारो जणांना पालखी सोहळ्याच्या दर्शनापासून वंचित राहावे लागले आहे. तरीदेखील शिवशाही पालखी सोहळ्याच्या फुलांनी सजवलेल्या रथावर नागरिकांनी पुष्पवृष्टी करत ज्ञानोबा तुकारामचा गजर केला.

पालखी सोहळासमवेत परंपरेनुसार असणारे शिंगाडवादक तांबे यांनी पालखीतील पादुकांचे तुतारीची ज्ञानोबा-तुकाराम गजराची वंदना दिली. मानाचे विणेकरी, टाळकरी, तुळशी वृंदावन याची पूजा इंदापूरकरांनी मनोभावे केली. इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्यासह आरोग्य विभागाचे पथक व मानाचे वारकरी यावेळी उपस्थित होते. इंदापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी या वेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. या वेळी उपस्थित नागरिकांना कोविडचे नियम पाळून रांगेत पादुका दर्शन देण्यात आले.

या वेळी नगराध्यक्षा शहा यांनी पालखी अध्यक्ष नितीन महाराज मोरे, माणिक मोरे, माजी पाली सोहळा अध्यक्ष बाळासाहेब मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे, प्रल्हाद मोरे, टांकसाळे गुरुजी, शिंगाडवादक पोपड तंबे आदींचे स्वागत केले.

--

फोटो क्रमांक - २४तुकोबांच्या पालखीचे स्वागत

फोटो क्रमांक : फोटो ओळ : इंदापूर येथे संत तुकोबारायांच्या पालखीचे स्वागत करताना नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व पदाधिकारी.

240721\24pun_7_24072021_6.jpg

फोटो क्रमांक - २४तुकोबांच्या पालखीचे स्वागत फोटो क्रमांक :  फोटो ओळ : इंदापूर येथे संत तुकोबारायांच्या पालखीचे स्वागत करताना नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व पदाधिकारी

Web Title: Welcome to Indapur in the palanquin of Saint Tukobaraya on his return journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.