चाकण येथे कामगार-किसान सायकल रॅली चे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:05 AM2021-01-24T04:05:19+5:302021-01-24T04:05:19+5:30

सरकारने असे कायदे करून कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढून ही सगळी बाजारपेठ मोठ्या भांडवलदारांच्या व देशीविदेशी कॉर्पोरेट च्या ...

Welcome to Kamgar-Kisan Cycle Rally at Chakan | चाकण येथे कामगार-किसान सायकल रॅली चे स्वागत

चाकण येथे कामगार-किसान सायकल रॅली चे स्वागत

Next

सरकारने असे कायदे करून कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढून ही सगळी बाजारपेठ मोठ्या भांडवलदारांच्या व देशीविदेशी कॉर्पोरेट च्या ताब्यात देण्याचा रस्ता मोकळा केला आहे. त्यामधून किमान आधारभूत किमतीची व्यवस्था धान्याची सरकारी खरेदी आणि रेशन व्यवस्था क्रमशा मोडली जाईल. परिणामी शेतकऱ्यांना मिळणारे बाजारभाव एका बाजूस कोसळत जातील.तर दुसऱ्या बाजूला कॉर्पोरेट च्या मक्तेदारी मुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था देखील कोलमडून पडेल,इतकेच नव्हे तर देशाची किमान अन्नसुरक्षा देखील काही मूठभर कॉर्पोरेट साठेबाज धोक्यात आणतील. कंत्राटी शेतीचे नियमन करण्याच्या नावाखाली त्याबाबतचे विवाद न्यायालयात नेता येणार नाही, अशी तरतूद करून सरकारने ८६% अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांना बड्या कॉर्पोरेट च्या पंजातील शिकार बनवण्यासाठी मान्यता दिली आहे ,असे मत कॉम्रेड अजित अभ्यंकर व कामगार नेते कैलास कदम यांनी मांडले.

चाकण भारत ज्ञान विज्ञान समुदाय चे कार्यकर्ते यांनी सामाजिक गाणी ही या प्रसंगी म्हटली. कंत्राटी कामगार प्रथा रद्द करा, कामगार विरोधी नवे कायदे रद्द करा ,शेतकरी वाचवा देश वाचवा, जय जवान जय किसान, जनता विरोधी शेती कायदे रद्द करा,वीज विधेयक मागे घ्या अशा वेगवेगळ्या घोषणांनी दुमदुमूले. मुंबईतील आझाद मैदाना मध्ये २४ ते २६ जानेवारी धरणे आंदोलन करणार आहेत. चाकण मधील रॅलीचे नियोजन भारत ज्ञान विज्ञान समुदाय महाराष्ट्र व वडवानल कल्चरल सेंटर चाकण यांनी केले . अक्षय पानसरे ,राहुल जाधव, दीपक मांडेकर ,शेखर हाळुंदे सागर मांडेकर, विनायक आल्हाट, विवेक नाणेकर ,रोहित वाळके यांनी कार्यक्रमसाठी विशेष श्रम घेतले .

चाकण येथे कामगार किसान सायकल रॅलीचे स्वागत करताना.

Web Title: Welcome to Kamgar-Kisan Cycle Rally at Chakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.